Rafael Nadal Covid Positive : क्ले कोर्टचा अनभिषिक्त सम्राट राफेल नदाल कोरोनाबाधित, ट्वीट करत दिली माहिती
Rafael Nadal Covid Positive : कोरोना या जागतिक महामारीने टेनिस विश्वातील अव्वल दर्जाचा खेळाडू राफेल नदाललाही गाठलं आहे. नदालला नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे.
Rafael Nadal Covid Positive : दिग्गज टेनिस खेळाडू राफेल नदालला (Rafael Nadal) कोरोनाची बाधा (Corona Virus) झाली आहे. नुकताच अबुधाबी येथे टूर्नामेंट खेळून राफेल मायदेशी स्पेनला (Spain) परतल्यानंतर त्याला कोरोनाची बाधा झाली आहे. मागील आठवड्यात राफेलने अबु धाबी येथे एका प्रदर्शनी सामन्यात टेनिस कोर्टवर पुनरागमन करत बऱ्याच दिवसानंतर सामना खेळला होता. दरम्यान नदालने सोमवारी स्वत: ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली. नदालने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'मी अबु धाबी येथे टूर्नामेंटमध्ये खेळायला गेलो होतो. तिकडून आल्यानंतर मला कोरोनाची बाधा झाली आहे. मी स्पेनला आल्यानंतर आरटी-पीसीआर टेस्ट केली, ज्यानंतर मी बाधित आढळलो आहे.' पुढे ट्वीटमध्ये राफेललने लिहिलं आहे की, 'मला आशा आहे की मी हळू हळू यावर मात करुन ठिक होईन. सध्या मी घरीच विलगीकरणात असून जेही माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कृपया कोरोना चाचणी करुन घ्या. सध्याच्या परिस्थितीनुसार मला माझ्या आगामी सर्व इव्हेटंसमध्ये थोडा बदल करुन आरोग्यावरही लक्ष द्यावं लागेल. तसंच भविष्यातील निर्णयांबाबत मी तुम्हाला नक्कीच कळवत राहीन.' नदालने हे ट्वीट स्पॅनिश भाषेत केलं आहे.
राफेल दुखापतींनी ग्रस्त
याआधी राफेल शुक्रवारी अबु धाबी येथे मागील 4 महिन्यांतील पहिलाच सामना खेळला होता. एंडी मरेविरुद्ध खेळलेल्या या सामन्यात नदालला सलग सेट्समध्ये पराभव स्वीकारावा लागला. तो मागील काही काळ पायाच्या दुखापतीमुळे टेनिस कोर्टपासून दूर होता. तो ऑगस्टपासून एकही सामना खेळला नव्हता. त्यावेळी त्याला वॉशिंगटनच्या लॉयड हॅरिस याने मात दिली होती. राफेल विम्बलडन, टोक्यो ऑलम्पिक आणि यूएस ओपन या स्पर्धांमध्येही खेळला नव्हता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- IND vs SA 1st Test : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा पहिला सामना होणार प्रेक्षकांशिवाय, जाणून घ्या काय आहे कारण?
- The Ashes : अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाची सरशी, दुसरा सामनाही मोठ्या फरकानं खिशात, मालिकेत 2-0 ची आघाडी
- IPL 2022 : गौतम गंभीरचं IPL मध्ये पुनरागमन, आयपीएल 2022 मध्ये लखनौ संघाचा भाग
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha