एक्स्प्लोर
रिओ ऑलिम्पिकसाठी नरसिंगऐवजी प्रवीण राणाला संधी
नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमध्ये पैलवान नरसिंग यादवऐवजी आता प्रवीण राणा भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. भारतीय कुस्ती महासंघाने मंगळवारी यासंदर्भात घोषणा केली.
उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने नरसिंह यादवची ऑलिम्पिकवारी हुकली आहे. त्यामुळे आता ऑलिंपिकसाठी प्रवीण राणाची वर्णी लागली आहे. 23 वर्षीय प्रवीण राणा फ्रीस्टाईल कुस्तीच्या 74 किलो वजनी गटात खेळेल.
पैलवान प्रवीण राणाने 2014 मध्ये अमेरिकेत झालेल्या डेव्ह शल्त्झ मेमोरियल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती.
कुस्तीपटू नरसिंग यादव उत्तेजक सेवन चाचणीत दोषी
योगेश्वर दत्तकडून नरसिंगची पाठराखण दरम्यान, उत्तेजक चाचणीत दोषी आढळलेला भारताचा पैलवान नरसिंग यादवची पाठराखण करणाऱ्या दिग्गजांमध्ये आता पैलवान योगेश्वर दत्तही सामील झाला आहे. 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरनं कांस्यपदकाची कमाई केली होती. रिओ ऑलिम्पिक तोंडावर आलेलं असताना नरसिंग उत्तेजक चाचणीत दोषी आढळतो यावर विश्वास कसा बसायचा, असा सवाल करून योगेश्वरनं या प्रकरणाला कटकारस्थानाचा वास येत असल्याचा आरोप केला आहे. योगेश्वर दत्त आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, भारतीय कुस्तीवर ओढवलेल्या परिस्थितीमुळं मी आज दु:खी आहे. मी विश्वासानं सांगतो की, नरसिंग उत्तेजक घेऊ शकत नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे.नरसिंग कटाचा बळी, न्यायासाठी लढणारः WFI
निर्दोषत्त्व सिद्ध करण्याची नरसिंगची अखेरची संधी पैलवान नरसिंग यादवला उत्तेजक प्रकरणात आपण निर्दोष असल्याचं सिद्ध करण्याची उद्या अखेरची संधी मिळेल. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी म्हणजे नाडाच्या कार्यालयात आज दुपारी चार वाजता नरसिंगची सुनावणी होणार आहे. ही सुनावणी नाडाच्या शिस्तपालन समितीसमोर होईल. या सुनावणीत नरसिंगला त्याच्या बाजूनं चौघांना साक्षीसाठी बोलावता येईल. तसंच या सुनावणीत वकील विदुष सिंघानिया हे त्याची बाजू मांडतील.गोळाफेकपटू इंद्रजीत सिंहवरही डोपिंगचा डाग
नरसिंगला न्याय मिळवून देण्यासाठी क्रीडमंत्र्यांना पत्र : मुख्यमंत्री पैलवान नरसिंग यादव न्याय मिळवून देण्यासाठी आपण केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांना पत्र लिहिलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. नरसिंग यादव उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळं त्याची ऑलिम्पिकवारी हुकण्याची शक्यता आहे. यासंदर्भात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय क्रीडामंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची माहिती दिली.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement