(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PKL 2022: पीकेएलच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, 4 स्टार खेळाडू नवव्या हंगामात नाही खेळणार
Pro Kabaddi League 2022: भारतात प्रो कबड्डी लीगला अल्पकाळात मोठी प्रसिद्धी (PKL 2022) मिळाली आहे. या लीगच्या नवव्या हंगामाला येत्या 7 ऑक्टोबरपासून सुरुवात होतेय.
Pro Kabaddi League 2022: भारतात प्रो कबड्डी लीगला अल्पकाळात मोठी प्रसिद्धी (PKL 2022) मिळाली आहे. या लीगच्या नवव्या हंगामाला येत्या 7 ऑक्टोबरपासून सुरुवात होतेय. या हंगामासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया 5, 6 ऑगस्ट 2022 ला पार पडली. या हंगामातील सर्व सामने बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद येथे खेळवले जाणार आहेत. कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं प्रो कबड्डीच्या मागच्या हंगामात प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, या हंगामात प्रेक्षकांना मैदानात बसून सामन्याचा आनंद घेता येणार आहे. परंतु, या हंगामात चार स्टार खेळाडू खेळणार नसल्यानं चाहत्यांमध्ये निराशा पसरलीय. हे खेळाडू कोण आहेत? त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात.
जीवा कुमार
प्रो कबड्डी लीगचा दिग्गड डिफेंडर जीवा कुमारनं यू मुंबाकडून पीकेएलमध्ये पदार्पण केलं. यू मुंबासाठी चार हंगाम खेळल्यानंतर तो पाचव्या हंगामात यूपी योद्धाच्या संघात सामील झाला. यूपीसाठी दोन हंगाम खेळल्यानंतर त्यानं सातव्या हंगामात बंगाल वॉरियर्सकडून खेळला. प्रो कबड्डी लीगच्या मागच्या हंगामात त्यानं गतविजेते दंबग दिल्लीचं प्रतिनिधित्व केलं होतं. दरम्यान, 136 सामन्यांत 257 टॅकल पॉइंट घेणारा जीवा यंदाच्या हंगामात यूपी योद्धाचा सहाय्यक प्रशिक्षकपदाची जबाबदारी संभळणार आहे. याच कारणामुळं तो 9व्या हंगामात खेळताना दिसणार नाही.
संदीप नरवाल
लीगमधील सर्वात शक्तिशाली ऑलराऊंडर खेळाडूंपैकी एक असलेल्या संदीप नरवालनं पटना पायरेट्ससह पदार्पण केलं आणि तीन हंगामांनंतर त्यानं तेलुगू टायटन्समध्ये प्रवेश केला. यानंतर, पुणेरी पलटणमध्ये दोन हंगाम आणि यू मुंबामध्ये एक हंगाम खेळल्यानंतर तो गेल्या मोसमात दबंग दिल्लीकडून खेळला. लीगमध्ये 348 टॅकल आणि 275 रेड पॉइंट्स घेणारा संदीप पहिल्यांदाच लीगचा भाग असणार नाही.
अजय ठाकूर
अजय ठाकूर हा केवळ लीगमधीलच नव्हे तर भारतातील सर्वात दिग्गज कबड्डीपटूंपैकी एक आहे. त्यानं आत्तापर्यंतच्या आठही हंगामात सहभाग घेतला असून 794 रेड पॉइंट जमा केले आहेत. तो लीगमधील सहावा सर्वात यशस्वी रेडर आहे. या हंगामाच्या लिलावात ठाकूरचं नाव नव्हतं. फिटनसमुळं लीगमधून माघार घेतल्याचं अजय ठाकूर यांनी स्वत: सांगितलं होतं.
मनजीत छिल्लर
लीगमधील सर्वाधिक 391 टॅकल पॉइंट्स मिळवलेला खेळाडू मनजीत छिल्लर देखील पहिल्यांदाच लीगचा भाग असणार नाही. डिफेन्समध्ये चमकदार कामगिरी करण्यासोबतच मनजीतनं 225 रेड पॉइंट्सही घेतले आहेत. प्रो कबड्डीच्या मागच्या हंगामात तो दबंग दिल्लीचा भाग होता. मात्र, या हंगामात तो वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तेलुगू टायटन्सनं त्याच्यावर सहाय्यक प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे.
हे देखील वाचा-