एक्स्प्लोर

PBKS vs SRH, IPL 2021: हैदराबादचा आयपीएलमधील पहिला विजय, पंजाबवर 9 विकेट्सने मात

PBKS vs SRH, IPL 2021 Highlights:  चेन्नईमध्ये सुरु असलेल्या पंजाब आणि हैदराबादमधील सामन्यात हैदराबादनं पंजाबवर 9 विकेट्सने विजय मिळवला आहे.  

PBKS vs SRH, IPL 2021 Highlights:  चेन्नईमध्ये सुरु असलेल्या पंजाब आणि हैदराबादमधील सामन्यात हैदराबादनं पंजाबवर 9 विकेट्सने विजय मिळवला आहे. पंजाबच्या 121 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी पॉवरप्लेमध्ये हैदराबादसाठी 50 धावा केल्या. 11व्या षटकात फॅबिएन एलनने वॉर्नरला बाद करत पंजाबला पहिले यश मिळवून दिले. वॉर्नरने 3 चौकार आणि एका षटकारासह 37 धावा केल्या. वॉर्नर-बेअरस्टो यांनी 73 धावांची सलामी दिली.

त्यानंतर बेअरस्टो आणि केन विल्यमसन यांनी नाबाद भागिदारी रचत संघाला विजय मिळवून दिला. बेअरस्टोनं 56 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 63 धावा केल्या. तर विल्यमसननं 19 चेंडूत 16 धावा केल्या.

त्याआधी हैदराबादनं पंजाबला 120 धावांमध्ये रोखलं आहे. पंजाबचा संघ 120 धावांवर ऑलआऊट झाला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही.  केएल राहुल केवळ चार धावांवर बाद झाला. तर मयंक अग्रवाल 22 धावांवर बाद झाला.  6 षटकात पंजाबने 32 धावा फलकावर लावल्या. पॉवरप्लेनंतर मयंक बाद झाला. खलील अहमदने त्याला (22) झेलबाद केले. अग्रवालनंतर आलेला निकोलस पूरनही शून्यावर धावबाद झाला. राशिद खानने ख्रिस गेलला पायचित करत पंजाबला मोठा धक्का दिला. गेलला केवळ 15 धावा करता आल्या. गेल बाद झाल्यानंतर पंजाबचा डाव सावरलाच नाही.  दीपक हुडा 13 धावांवर तर मोझेस हेन्रिक्स 14 धावांवर बाद झाले. त्यानंतर आलेल्या शाहरुख खानने 2 षटकारांसह 22 धावा करत संघाला 100 पार पोहोचवले. मात्र तो 22 धावांवर बाद झाला. शाहरुख बाद झाल्यानंतर पंजाबच्या तळाच्या फलंदाजांनीही नांग्या टाकल्या. शेवटच्या षटकात मोहम्मद शमी धावबाद होताच पंजाबचा डाव 120 धावांवर संपुष्टात आला.  हैदराबादकडून खलील अहमदने 21 धावांत 3, अभिषेक शर्माने 2 तर भुवनेश्वर कुमार, राशिद खान, सिद्धार्थ कौलनं एक एक विकेट घेतली.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget