एक्स्प्लोर

पोरानं साताऱ्याचं नाव काढलं!  पार्थ साळुंखेने लक्ष्य वेधलं अन् भारताला सुवर्णपदक मिळाले

Parth Salunkhe : साताऱ्याच्या पार्थ साळुंखे याने आर्यलँड येथे सुरु असलेल्या आर्चरी युवा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या रिकर्व्ह श्रेणीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.  

Parth Salunkhe Becomes First Indian Archer to Win Youth World Championship in Recurve Category : साताऱ्याच्या पार्थ साळुंखे याने आर्यलँड येथे सुरु असलेल्या आर्चरी युवा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या रिकर्व्ह श्रेणीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारताने युवा आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत 10 पेक्षा जास्त पदकांची कमाई केली आहे. ही भारताची युवा आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. साताऱ्याच्या पार्थ साळुंखे याने 21 वर्षाखालील वयोगटात रिकर्व्ह प्रकारात कोरियाच्या खेळाडूला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. या प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा तो भारताचा पहिला तिरंदाज ठरला.  पार्थने सातव्या मानांकित सोंग इंजूनला पाच सेटपर्यंत कडवी झुंज दिली. पार्थने सोंग इंजूनला 7 - 3 (26-26, 25-28, 28-26, 29-26, 28-26) असे पराभूत केलं.

पार्थ साळुंखे याने 10 पैकी 10 गुण मिळवणारे दोन तर 10 पैकी 9 गुण मिळवणारा एक निशाणा साधला.  फायनलमध्ये पार्थने 5 - 3 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर दोन एक्स (एकमद मध्यभागी निशाणा साधणे) निशाणे साधत पार्थने दमदार शेवट केला. पार्थच्या यशानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पार्थ हा मूता साताऱ्याजवळील करंजेपेठचा रहिवाशी आहे. पार्थला वडिलांकडूनच आर्चरचे मार्गदर्शन मिळाले.

आयर्लंड येथील लिमरीक येथे नुकत्याच झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत पार्थ साळुंखे याने सुवर्ण कामगिरी केली. पार्थ साळुंखे जुनिअर वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. पार्थ फक्त एवढ्यावर थांबला नाही तर दुहेरीमध्येही त्याने भारताला पदक मिळवून दिलेय. मिश्र दुहेरी गटात पार्थ आणि हरियानाची रिद्धी फोर या दोघांनी मिळून कांस्य पदकाची कमाई केली. त्यामुळे आता पार्थने भारताला जागतिक स्पर्धेत दोन पदके जिंकून दिली आहेत. शनिवारी साताऱ्याची युवा महिला तिरंदाज आदिती स्वामी हिनेदेखील कंपाउंड प्रकारात विश्वविजेती होण्याचा मान मिळवलाय.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget