एक्स्प्लोर
पाक चाहत्यांचा किळसवाणा प्रकार, आक्षेपार्ह फोटोद्वारे कोहलीची थट्टा
मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धची अखेरची कसोटी अनिर्णित राहिल्याने पाकिस्तानने आयसीसी कसोटी क्रिकेट क्रमवारीत भारताला मागे टाकून पहिल्या स्थानावर झेप घेतली. पण पाकिस्तानला कारकीर्दीत पहिल्यांदाच हा पराक्रम करता आला आहे. त्यामुळे पाकिस्तान चाहत्यांना जणू आंनंदाच्या उकळ्या फुटत आहेत.
त्यामुळेच पाकिस्तानी चाहत्यांनी बांगलादेशप्रमाणेच किळसवाण्या प्रकाराची हद्द गाठली आहे.
पाकिस्तानी चाहत्यांनी सोशल मीडियावर विराट कोहलीचे आक्षेपार्ह फोटो पोस्ट करुन भारताची थट्टा केली आहे. चाहत्यांनी मिसबाह उल हक आणि विराट कोहलीचा फोटोशॉप केलेले फोटो व्हायरल केले आहेत. मिसबाहने विराटला उलचलल्याचं या फोटोत दाखवण्यात आलं आहे.
तर दुसऱ्या फोटोमध्ये मिसबाह राजाप्रमाणे सिंहासनावर बसलेला असून विराट कोहली शिपायाप्रमाणे त्याच्या शेजारी उभा असल्याचं दाखवलं आहे.
याआधी आशिया चषक आणि 2016 ट्वेण्टी-20 क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनल आधी बांगलादेशी फॅन्सनी त्यांच्या विकृतचं घडवत टीम इंडियाची थट्टा केली होती. बांगलादेशचा गोलंदाज तस्किन अहमलच्या हाती महेंद्रसिंह धोनीचं शीर दाखवण्यात आलं होतं.
आता पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांनीही काहीसं असंच केलं आहे. आपल्या टीमचं अभिनंदन करताना विराट कोहलीचा फोटो वापरत भारताची थट्टा केली.
आता पाकिस्तानी चाहत्यांनी असा प्रताप केल्यावर गप्प बसतील ते भारतीय चाहते कसले. त्यांनीही पाकिस्तानी चाहत्यांना सडेतोड उत्तर दिलं. एका ट्विपलने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "अबे भिखारी जब इधर-उधर कोई टीम हारी या जीती तब तो तुम फर्स्ट टाइम नं 1 बने, बनते ही कर दी भिखारियों वाली बात."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement