एक्स्प्लोर

PAK vs NED Match Highlights: नेदरलँडच्या गोलंदाजांनी कमावलं, पण कचखाऊ फलंदाजीनं गमावलं; वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा भारतीय भूमीत पहिला विजय

नेदरलँडकडून बॅस दे लीडेनं दाखवलेली अष्टपैलू कामगिरी सुद्धा नेदरलँडला पराभवापासून वाचवू शकली नाही. त्यामुळे 205 धावांमध्ये नेदरलँडला गुंडाळून पाकिस्तानला स्पर्धेत विजयी श्रीगणेशा केला

हैदराबाद : नेदरलँडच्या (Netherlands) गोलंदाजांनी केलेल्या केलेल्या दमदार कामगिरीमुळे बलाढ्य पाकिस्तानला (Pakistan) 286 धावांमध्ये रोखण्यात यश आले होते. मात्र, फलंदाजांनी तोच बाणा न दाखवल्याने 81 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. नेदरलँडकडून बॅस दे लीडेनं दाखवलेली अष्टपैलू कामगिरी सुद्धा नेदरलँडला पराभवापासून वाचवू शकली नाही. त्यामुळे 205 धावांमध्ये नेदरलँडला गुंडाळून पाकिस्तानने (ICC Cricket World Cup 2023) स्पर्धेत विजयी श्रीगणेशा केला. नेदरलँडकून विक्रम सिंगने अर्धशतकी खेळी केली. मधल्या फळीतील बॅस दे लीडेनं 98 चेंडू 67 धावा पटकावल्या. व्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाला पाकिस्तानच्या गोलंदाजांचा प्रतिकार करता आला नाही. त्यामुळे त्यांचा डाव 205 धावात गुंडाळला गेला.

पाकिस्तान कडून शाहीन आफ्रिदीनं एक विकेट घेतली. हसन अलीनं दोन विकेट घेतल्या, हॅरीस रौफनं तीन विकेट घेतल्या. तर इप्तिकार अहमद, मोहम्मद नवाज आणि शादाब खान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. पाकिस्तानच्या माऱ्यासमोर नेदरलँडच्या मधल्या फळीची कोणतीच मात्रा चालली नाही. त्यामुळे नेदरलँडला पराभवाला सामोरे जावे लागले. 

रिझवान, सौद शकीलच्या खेळीने सावरले

वर्ल्डकपच्या (ICC Cricket World Cup 2023) सलामीच्या सामन्यात अत्यंत सोपा असा पेपर असलेल्या पाकिस्तानला (Pakistan vs Netherlands) दुबळ्या असणाऱ्या तुलनेतील दुबळ्या असणाऱ्या नेदरलँडने (Netherlands) अक्षरशः घाम फोडला. नेदरलँडने केलेल्या भेदक गोलंदाजीने पाकिस्तानच्या कोणत्याही फलंदाजाला जग धरता आला नाही. त्यामुळे पाकिस्तानला (Pakistan) समोर दुबळा प्रतिस्पर्धी असूनही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पाकिस्तानला 49 षटकांत 286 धावांवर गुंडाळत नेदरलँडने दमदार कामगिरी केली. नेदरलँडकडून बॅस दे लीडेनं भेदक मारा करताना पाकिस्तानच्या चार फलंदाजांना तंबूत धाडले. आर्यन दत्त, लाॅगन वॅन बीक, काॅलिन अॅकरमन आणि पाॅल वॅन मिकेरेने यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

मधल्या फळीतील मोहम्मद रिजवान आणि सौद शकीलने केलेल्या अर्धशतकीय खेळीनंतर पाकिस्तानच्या डावाला आकार आला. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केल्यामुळे पाकिस्तानला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. मोहम्मद रिजवान 68 धावांवर बाद झाला. सौद शकीलही 68 धावांवर बाद झाला. त्यानंतर इफ्तिकार अहमदही बाद झाल्याने पाकिस्तानची अवस्था 6 बाद 188 अशी झाली. यानंतर पाकिस्तान किमान सन्मानजनक धावसंख्या उभारतो की नाही? अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, मोहम्मद नवाज आणि शादाब खान यांनी केलेल्या छोटेखाली खेळीमुळे पाकिस्तानला कशीबशी अडीचशेपर्यंत मजल मारता आली. 

मात्र त्यानंतरही नेदरलँडने दोघांनाही झटपट बाद करत पाकिस्तानला मोठ्या धावसंख्येपासून रोखलेय. नेदरलँडचा मारा सुरुवातीपासूनच संयमित राहिला. त्यामुळे एकंदरीत पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. नाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार बाबर आझम आम्ही 300च्या वर स्कोअर करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, एकंदरीतच पाकिस्तानची फलंदाजांची फळी नेदरलँडच्या गोलंदाजीसमोर कमजोर दिसून आली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किमतींत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किमतींत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Shatrughan Sinha Health Updates :  शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Crime : पैशाच्या वादातून बीडमध्ये सरपंचाचा जीव घेतलाMajha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :01 जुलै 2024ABP Majha Headlines :  6:30AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किमतींत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किमतींत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Shatrughan Sinha Health Updates :  शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेन वेळेवर धावण्यासाठी नवा फंडा, रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याला कल्याणमध्ये बसवण्याचा प्रस्ताव, पण....
मुंबईतील लोकल ट्रेन वेळेवर धावण्यासाठी नवा फंडा, रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याला कल्याणमध्ये बसवण्याचा प्रस्ताव, पण....
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Embed widget