एक्स्प्लोर

विनेश फोगाटच्या वजनावर लक्ष ठेवण्यात सपोर्ट स्टाफ अपयशी का ठरला? चौकशी होणार

Paris Olympic 2024: अवघ्या काहीशा ग्रॅम वजनामुळे विनेशनं आपलं आयुष्य ज्या कुस्तीसाठी वेचलं, त्याच कुस्तीच्या सामन्यात ती न खेळताच पराभूत झाली आणि तिच्यासोबत कोट्यवधी भारतीयांचं सुवर्णस्वप्न भंगलं.

Olympics WFI To Investigate Support Staff Of Vinesh Phogat: संपूर्ण भारतासाठी 7 ऑगस्टचा दिवस काळा दिवस ठरला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भारताची धडाकेबाज महिला कुस्तीपटू विनेश फोगाटसह (Vinesh Phogat)  कोट्यवधी भारतीयांनी पाहिलेल्या गोल्डन स्वप्नांचा चुरडा झाला. निर्धारित वजन मर्यादेत न बसल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) गोल्ड जिंकण्यासाठी सज्ज झालेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र म्हणून घोषित करण्यात आलं. भारतीयांसह विनेश आणि सुवर्णपदकाच्या आड आलं ते विनेशचं वाढलेलं वजन. अवघ्या काहीशा ग्रॅम वजनामुळे विनेशनं आपलं आयुष्य ज्या कुस्तीसाठी वेचलं, त्याच कुस्तीच्या सामन्यात ती न खेळताच पराभूत झाली. विनेशनं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. पोरीनं आपलं रक्त काढलं, केस कापले, रात्रभर सायकलिंग, स्किपिंग अन् जे-जे शक्य होतं, ते-ते सर्व केलं, पण शेवटी तिचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. शेवटी तिनं परिस्थितीचा स्विकार केला आणि मोठ्या जड अंतःकरणानं जीवापेक्षा प्रिय असलेल्या कुस्तीला अलविदा केला. 

विनेश अपात्र ठरल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तिच्या वाढलेल्या वजनावर, तिच्यावर एवढंच नाहीतर तिच्या सपोर्ट स्टाफवरही. अशातच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशला फायनलमधून अपात्र ठरवण्यात आल्याचा निर्णय आला आणि एकच गदारोळ झाला.  WFI अध्यक्षांनी विनेशच्या सपोर्ट स्टाफच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. विनेशचं वजन निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त कसं झालं? तिनं काय खाल्लं? नेमकं कसं आणि काय घडलं? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आता विनेशच्या सपोर्ट स्टाफची चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 

विनेशचं वजन मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त होतं. त्यामुळे तिला अंतिम सामना खेळता आणि नाही आणि गोल्ड मेडल उंचावण्याचं तिचं स्वप्न पुरतं धुळीला मिळालं. विनेश अपात्र ठरल्यानंतर आता तिची उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्धी क्युबाच्या युस्नेलिस गुझमनला अंतिम फेरीत स्थान देण्यात आलं आहे. 

उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी विनेश फोगाटचं वजन सुमारे 49.9 किलो होतं, परंतु सहसा तिचं वजन 57 किलो असतं, त्यामुळे तिला वजन मर्यादेत राहण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. थोडंसं खाल्ल्यानं त्याचं वजन किमान 53 किलोपर्यंत वाढले.

उपांत्य फेरीनंतर तिचं वजन अंदाजे 52.7 किलो होतं. तिनं कोणताही ब्रेक न घेता, खाणं-पिणं न करता सतत वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. सकाळपर्यंत तिचं वजन 50.1 वर आणण्यात विनेश फोगटला यश आलं. मात्र, उर्वरित वजन कमी करण्यासाठी तिला अधिकचा वेळ मिळाला नाही.

विनेश अपात्र होण्यासाठी सपोर्ट स्टाफ जबाबदार?

मंगळवारी रात्री विनेश फोगटचं वजन दोन किलोनं वाढलं होतं. तिचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांनी विनेश फोगाटचं वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय योजले. ती रात्रभर झोपली नाही, खूप कमी पाणी घेत होती, ऑलिम्पिक स्पोर्ट्स व्हिलेजमधील जिममध्ये तासन्तास स्किपिंग, जॉगिंग आणि सायकलिंग करत होती. याशिवाय विनेश फोगटनं तिचे केसही कापलं. रक्त काढलं. पण याचा काहीच उपयोग झाला नाही. तिचे कोणतेही उपाय प्रभावी ठरले नाहीत आणि तिचं वजन मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आलं. 

सपोर्ट स्टाफचीही चौकशी 

विनेश फोगाटचा सपोर्ट स्टाफ वजनावर लक्ष ठेवण्यासाठी अपयशी का ठरला? असा प्रश्नही सध्या उपस्थित केला जात आहे. तिची काळजी घेण्यासाठी प्रसिद्ध हंगेरियन प्रशिक्षक वोलार अकोस आणि फिजिओ अश्विनी जीवन पाटील यांच्यासह वैयक्तिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी तिचं वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न केला, पण वेळेअभावी शक्य झालं नाही आणि काहीशा ग्रॅम वजनामुळे विनेश पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

"माझ्यात जास्त ताकद राहिलेली नाही... मी हरलेय..."; ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणारPune Ajit Pawar Vadapav : बाप्पांच्या विसर्जनात Ajit Pawar यांनी घेतला वडापावचा आस्वाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget