(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Antim Panghal Ban: विनेश फोगाटच्या निवृत्तीनंतर आणखी एक धक्का, पैलवान अंतिम पंघालवर तीन वर्षांच्या बंदीचं सावट
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये घडलेल्या प्रकारानंतर विनेश फोगाटनं निवृत्ती जाहीर केली. तर, 53 किलो वजनी गटातील पैलवान अंतिम पंघालवर तीन वर्षांची बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.
Paris Olympics 2024 पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) भारताचे अनेक खेळाडू पदकापासून एक पाऊल दूर राहिले. पैलवान विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिला अंतिम फेरीपर्वी झालेल्या चाचणीत वजन जास्त असल्यानं स्पर्धेतून निलंबित करण्यात आलं. या सर्व घटनेनंतर विनेश फोगाटनं कुस्ती जिंकली मी हरलीय म्हणत निवृत्ती जाहीर केली. भारताला हा एक धक्का बसलेला असतानाच 53 किलो वजनी गटातील पैलवान अंतिम पंघाल (Anitm Panghal) हिला देखील आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाकडून अंतिम पंघालवर तीन वर्षांची बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. शिस्त भंग केल्यानं अंतिम पंघालवर ही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. अंतिम पंघालनं या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. पॅरिसमध्ये नेमकं काय घडलं याबाबत अंतिम पंघालनं सांगितलं आहे.
पॅरिसमध्ये काय घडलं, अंतिम पंघालनं सांगितलं
अंतिम पंघाल हिला तिच्या प्रवेशपत्रावर बहिणीला ऑलिम्पिक विलेजमध्ये प्रवेश देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर अंतिम पंघालवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. अंतिम पंघालनं या प्रकरणात नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. अंतिम पंघाल हिनं तिची प्रकृती खराब असल्यानं बहीण साहित्य आणण्यासाठी तिथं गेली होती, असं म्हटलं.
अंतिम पंघालनं पीटीआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना म्हटलं की तिची प्रकृती खराब होती. ती म्हणाली, " काल माझी बाऊट होती, मात्र योग्य प्रकारे न खेळल्यानं पराभव झाला, ज्या चर्चा कालपासून सुरु आहेत की अंतिमच्या बहिणीला पोलीस पकडून घेऊन गेले किंवा अंतिम पंघालला पोलीस पकडून घेऊन गेले, असं काहीही झालेलं नाही. माझी तब्येत बिघडली होती, ताप आलेला होता, माझी बहीण ज्या हॉटेलमध्ये थांबलेली होती तिथं मला घेऊन जाणार होती, मी यासाठी परवानगी देखील घेतलेली होती", असं अंतिम पंघाल म्हणाली.
अंतिम पंघाल पुढं म्हणाली, माझं काही साहित्या ऑलिम्पिक विलेजमध्ये राहिलेलं होतं, मला त्याची आवश्यकता होती. ताप असल्यानं झोपली होते, यामुळं माझी बहीण कार्ड घेऊन तिथं गेली होती. तिथं बहिणीकडून कार्ड घेतलं गेलं अन् पोलीस स्टेशनला पडताळणीसाठी घेऊन गेले होते, असं अंतिम पंघालनं म्हटलं.
कॅब ड्रायव्हरसोबत वाद झाला का?
अंतिम पंगालनं कॅब ड्रायव्हर सोबत झालेल्या वादासंदर्भात देखील माहिती दिली. मॅचमध्ये पराभूत झाल्यानंतर प्रशिक्षक देखील दु:खी झाले होते. मी लगेचच हॉटेलला आली होती, ते तिथेच थांबले होते, आम्ही त्यांच्यासाठी कॅब बुक केली होती. मात्र ते हॉटेलला आले तेव्हा कॅब चालकाला देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी रक्कम नव्हती. ड्रायव्हरला हॉटेलमधून यूरो आणतो असं सांगितलं होतं. कोच रुममध्ये आले आणि यूरो घेऊन गेले. दरम्यानच्या काळात ड्रायव्हर नाराज झाला होता मात्र वाद झाला नव्हता, असं अंतिम पंघाल म्हणाली.
VIDEO | There has been a disciplinary action against wrestler Antim Panghal at the ongoing Paris Olympics. The wrestler has issued her side of the story in a video:
— Press Trust of India (@PTI_News) August 8, 2024
"I had come here to Olympics, there was a bout yesterday. I got defeated. It is wrong that police had taken me.… pic.twitter.com/xVMrTpOMkP
संबंधित बातम्या :