Vinesh Phogat Disqualified: वजन कमी करण्यासाठी पोरीनं रक्त काढलं, तरी 50 ग्रॅम जास्तच भरलं; कुस्तीमधील वजनाचा नियम काय?
Vinesh Phogat Disqualified: सामन्यापूर्वी विनेशचं वजन करण्यात आलं, पण दुर्दैवानं तिचं वजन काही ग्रॅम जास्त भरलं. वजनाची अट ओलांडल्यामुळे विनेश फोगाटला अपात्र घोषित केलं असून आता तिचं सुवर्णभरारी घेण्याचं स्वप्न भंगलं आहे.
Vinesh Phogat Disqualified From Paris Olympic 2024 : फक्त तिनंच नाहीतर, संपूर्ण भारतानं तिच्यासोबत गोल्ड जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण फक्त काहीशा ग्रॅम वजनामुळे तिच्या गोल्डन स्वप्नांचा पुरता चुरडा झाला आहे. कोट्यवधी भारतीयांनी तिच्या सुवर्णभरारीसाठी प्रार्थना केल्या होत्या. पण तिच्यात आणि ध्येयामध्ये 50 ग्रॅम वजन आडवं आलं आणि होत्याचं नव्हतं झालं. भारताची धडाकेबाज कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकमधून (Paris Olympic 2024) अपात्र घोषित करण्यात आलं. विनेशला अपात्र घोषित केल्यामुळे भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला मोठा धक्का बसला आहे.
विनेशनं 50 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये धडक दिली होती. आज रात्री 10 वाजता फायनलचा सामना खेळवला जाणार होता. सामन्यापूर्वी विनेशचं वजन करण्यात आलं, पण दुर्दैवानं तिचं वजन काही ग्रॅम जास्त भरलं. वजनाची अट ओलांडल्यामुळे विनेश फोगाटला अपात्र घोषित केलं असून आता तिचं सुवर्णभरारी घेण्याचं स्वप्न भंगलं आहे.
विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे. विनेश फोगाट रौप्य आणि कांस्य पदकासाठीही पात्र होणार नाही.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचं वजन 50 किलोशी जुळत नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) नं म्हटलं आहे की, महिला कुस्ती 50 किलो गटातून विनेश फोगटच्या अपात्रतेची बातमी अत्यंत खेदजनक आहे. टीमनं रात्रभर केलेल्या प्रयत्नांनंतरही, आज सकाळी तिचं वजन 50 किलोंपेक्षा काही ग्रॅम जास्त होतं. दरम्यान, रात्रभर विनेशनं वजन कमी करण्यासाठी कसोशिनं प्रयत्न केले. तिनं स्वतःचं रक्त काढलं, तिचे केस कापले, पण तरिदेखील ती निर्धारित वयाची मर्यादा गाठू शकली नाही.
कुस्तीमधील वजनाचा नियम काय?
कुस्तीमध्ये, कोणत्याही कुस्तीपटूला फक्त 100 ग्रॅम जास्त वजनाची सूट मिळते. म्हणजेच, विनेशचं वजन 50 किलो 100 ग्रॅम असतं, तर ती सुवर्णपदकाची लढत खेळू शकली असती, पण तिचं वजन त्याव्यतिरिक्त आणखी 50 ग्रॅम जास्त होतं आणि त्यामुळे तिचे ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. कुस्तीमध्ये कुस्तीच्या सामन्यांपूर्वी पैलवानांचे वजन केले जाते. याशिवाय कुस्तीपटूला त्याच श्रेणीत आपले वजन 2 दिवस राखायचे आहे परंतु विनेशला तसे करता आले नाही. रिपोर्ट्सनुसार, तिचं वजन 52 किलोपर्यंत पोहोचलं होतं, तिनं ते कमी करण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी ती अपयशी ठरली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :