एक्स्प्लोर

Tokyo Olympics 2020 : तिरंदाजीत भारताला निराशा, प्रवीण जाधवचा पराभव, आव्हान संपुष्टात 

Tokyo Olympics 2020 :  तिरंदाजीमध्ये भारताच्या हाती निराशा आली आहे. चांगली कामगिरी करणारा प्रवीण जाधव राउंड ऑफ 16 च्या फेरीतून बाहेर पडला आहे.

Tokyo Olympics 2020 :  तिरंदाजीमध्ये भारताच्या हाती निराशा आली आहे. चांगली कामगिरी करणारा प्रवीण जाधव राउंड ऑफ 16 च्या फेरीतून बाहेर पडला आहे.  सलग तीन सेट गमावल्यानं सामना हरल्यामुळं प्रवीणचं आव्हान संपुष्टात आलं आहे. अमेरिकेच्या फ्रेडी अॅलेक्सनसमोर या सामन्यात  प्रवीण जाधव काहीसा अडखळताना दिसून आला.  

ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीत साताऱ्याच्या प्रवीण जाधवनं शानदार कामगिरी केली. मागील सामन्यात त्यानं सलग तीन सेट जिंकत राउंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला होता. त्यानं जगात नंबर 2 असलेल्या खेळाडूचा पराभव करत राउंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. मात्र इथं त्याचा पराभव झाला.  तसंच मिक्स डबल सोडलं तर व्यक्तिगत त्याची कामगिरी अन्य स्पर्धेत चांगली राहिली आहे. 

भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाचं ( Indian women's hockey team )प्रदर्शन अत्यंत निराशाजनक राहिलं आहे. आज सलग तिसऱ्यांदा भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव झाला आहे. आजच्या सामन्यात ग्रेट ब्रिटननं भारतीय महिला संघाला 4-1 अशी मात दिली. याआधीच्या सामन्यात जर्मनीनं भारतीय महिला संघाचा 2-0 असा पराभव केला होता.

भारतीय महिला हॉकी टीम आपले सलग तीन सामने गमावल्यामुळं ऑलिम्पिकमध्ये आता काही अपेक्षा उरलेल्या नाहीत. पहिला सामना नेदरलॅंडविरुद्ध 5-1 नं गमावला होता. तर दुसऱ्या सामन्यात जर्मनी विरुद्ध 2-0 नं  भारतीय महिला हॉकी टीमचा पराभव झाला होता. भारतीय महिला संघाला तीन सामन्यात आतापर्यंत केवळ दोनच गोल करता आले आहेत.  

Tokyo Olympics 2020 LIVE : भारतीय महिला हॉकी टीमचा ग्रेटब्रिटनकडून पराभव, पीव्ही सिंधूचा आणखी एक दमदार विजय

भारतीय पुरुष हॉकी संघाचा स्पेनवर मात करत दणदणीत विजय

काल भारतीय पुरुष हॉकी संघानं ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या पराभवाचा वचपा काढत स्पेनचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला होता. भारतानं स्पेनला 3-0 अशा फरकानं नमवलं. भारतानं पहिले दोन गोल पहिल्या क्वॉर्टरमध्ये डागले, तर तिसरा गोल शेवटच्या क्वॉर्टरमध्ये डागला. स्पेनचा संघ आठ पेनल्टी कॉर्नर मिळाल्यानंतरही गोल करण्यात अयशस्वी ठरला. 

पीव्ही सिंधूचा आणखी एक दमदार विजय, प्री-क्वॉर्टर फायनल्समध्ये धडक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार बॅडमिन्टन खेळाडू पीव्ही सिंधूचं उत्तम प्रदर्शन पाहायला मिळत आहे. पीव्ही सिंधूनं आणखी एक विजय मिलवला आहे. सिंधूनं प्री-क्वॉर्टर फायनल्समध्ये धडक दिली आहे. सिंधुनं हाँगकाँगच्या खेळाडूला सरळ सेटमध्ये 21-9, 21-16 नं पराभूत केलं. सिंधूनं पदकाच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढं टाकलं आहे. 

धनुर्विद्येत तरुणदीप रॉयचा विजय

धनुर्विद्येत भारतासाठी आनंदाची बातमी आहे. राउंड ऑफ 32 मध्ये तरुणदीप रॉयने विजय मिळवला आहे. तरुणदीप रॉय आता पुढच्या राउंडमध्ये पोहोचला आहे. तरुणदीप रॉयकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. तरुणदीप रॉयने यापूर्वीच्या टीम इव्हेंटमध्येही उत्तम कामगिरी केली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget