Neeraj Chopra Instagram : गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ
Neeraj Chopra Instagram: नीरज चोप्राने शनिवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. ट्रॅक आणि फील्ड अॅथलेटिक्समध्ये भारताकडून पदक जिंकणारा तो पहिला खेळाडू आहे.
Neeraj Chopra Instagram: टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताचं नाव उंचावणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नीरज चोप्राची सध्या देशभरात चर्चा होत आहे. गेल्या 24 तासात नीरजच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या संख्येत 1 दशलक्षाहून अधिक वाढ झाली आहे. नीरजने ट्रॅक आणि फील्ड अॅथलेटिक्समध्ये भारताचे पहिले पदक जिंकले आहे.
इन्स्टाग्रामचे 24 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स
नीरजने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यापूर्वी, इन्स्टाग्रामवर सुमारे 1 दशलक्ष (10 लाख) फॉलोअर्स होते, जे शनिवारपासून वाढून 2.5 दशलक्ष (25 लाख) झाले आहेत. याशिवाय 5.50 लाखांहून अधिक लोकांनी त्याच्या पदकासह पोस्ट केलेले फोटो लाईक केले आहेत आणि हजारो लोकांनी कमेंट करून त्याचे अभिनंदन केले आहे. तो अनेकदा त्याचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टावर शेअर करतो.
नीरजला फॅशनचीही आवड
ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकल्याबद्दल खेळाडू नीरज चोप्राचे कौतुक केले जात आहे. पण असे दिसतंय की त्याचे केवळ खेळासाठीच नव्हे तर त्याच्या फॅशन सेन्ससाठीही कौतुक केले पाहिजे. त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर नजर टाकल्यास असे दिसून येते की 23 वर्षीय नीरजला फॅशनची प्रचंड आवड आहे.
प्रत्येक लूकमध्ये नीरज
स्पोर्ट्स ट्रॅक, पँट आणि टी-शर्टपासून कॅज्युअल जीन्स-शर्ट लूकपर्यंत, प्रत्येक लूकमध्ये नीरज उठून दिसतो. नीरजची व्यक्तिरेखा बघून तुम्हाला त्याची उत्तम ड्रेसिंग सेन्स कळेल. तो सर्व प्रकारच्या ड्रेसमध्ये दिसतात. युवा क्रीडा स्टार नीरजच्या सोशल मीडियावर चाहत्यांची संख्या सतत वाढत आहे.
नीरज चोप्रा कोण आहे?
नीरज चोप्रा हा भालाफेक स्पर्धेत भाग घेणारा भारतीय ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट आहे. तो मूळचा पानिपत, हरियाणाचा आहे. अंजू बॉबी जॉर्ज नंतर जागतिक चॅम्पियनशिप स्तरावर अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय आहे. नीरजने 2017 च्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 85.23 मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले होते.
2016 च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने 82.23 मीटर भालाफेक करुन सुवर्णपदक जिंकले आणि भारतीय राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केली. तर नीरजने 2017 च्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 85.23 मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने 86.47 मीटर भाला फेकून स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले होते.