Mirabai Chanu : भारताला आणखी एक धक्का, मीराबाई चानूचं स्वप्न भंगलं, कांस्य पदक थोडक्यात हुकलं, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची हुलकावणी
Mirabai Chanu : मीराबाई चानू हिनं 49 किलो वजनी गटात पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तिनं रौप्य पदक जिंकलं होतं.
![Mirabai Chanu : भारताला आणखी एक धक्का, मीराबाई चानूचं स्वप्न भंगलं, कांस्य पदक थोडक्यात हुकलं, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची हुलकावणी Mirabai Chanu missed to win medal in Paris Olympic big Setback for India Marathi News Mirabai Chanu : भारताला आणखी एक धक्का, मीराबाई चानूचं स्वप्न भंगलं, कांस्य पदक थोडक्यात हुकलं, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची हुलकावणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/08/dd3840125d9f98b53553ad5fa3eda4ea1723060198619989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris ) वेटलिफ्टिंगमध्ये भारताची मीराबाई चानू (Mirabai Chanu) 49 किलो वजनी गटात प्रतिनिधीत्व करत आहे. मीराबाई चानूनं अंतिम फेरीत धडक दिल्यानं सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देईल अशी भारतीयांना आशा होती. मीराबाई चानूनं स्नॅचमध्ये पहिल्या प्रयत्नात 85 किलो वजन उचललं होतं. तर, दुसऱ्या प्रयत्नात मीराबाई चानूनं 88 किलो वजन उचललं. स्नॅच प्रकारात मीराबाई चानूनं 88 किलो वजन उचललं. तर, क्लीन अँड जर्क प्रकारात मीराबाई चानूचे दोन प्रयत्न अयशस्वी ठरले. तिनं क्लीन अँड जर्क मध्ये 111 किलो वजन उचललं. यामुळं तिनं उचललं एकूण वजन 199 किलो झालं. या स्पर्धेत चीनच्या खेळाडूनं सुवर्ण पदक, रोमानियाच्या खेळाडूनं रौप्य पदक मिळवलं. थायलँडच्या खेळाडूला कांस्य पदक मिळवलं. मीराबाई चानू चौथ्या स्थानावर राहिली आणि भारताची पदकाशी आशा फोल ठरली.
मीराबाई चानूनं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत 202 किलो वजन उचलून रौप्य पदकावर नाव कोरलं होतं. मीराबाईनं स्नॅचमध्ये 85 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलून भारतासाठी पहिलं पदक मिळवून दिलं होतं.
मीराबाई चानू पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचली असली तरी तिच्या पुढं फिटनेसचं आव्हान असेल. मीराबाई चानूला गेल्या काही काळात दुखापतींचा सामना करावा लागला होता. त्यामुळं तिनं काही स्पर्धांमध्ये सहभाग घेतला नव्हता.
मीराबाई चानू सोबत अंतिम फेरीत जपानची आर. सुझूकी, चीनची झेड.एच. होऊ, मादगास्करची आर. रँडफिरसन, डोमेनियन रिपब्लिकची बी. पिरोन, थाईलँडची एस. खम्बाओ, गुहामची एन. लगताओ, रोमानियाची एमवी.कमेबीई, अमेरिकेची जे. डेलाक्रुझ, वेनेझुएलाची के. एचानदिया, चायनीज तैपेईची डब्ल्यू. एल फंग आणि बेल्जियमच्या एन. स्टेरकक्स यांनी देखील सहभाग घेतला.
दरम्यान, भारतानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत तीन पदकं जिंकली आहेत. नेमबाजीत मनू भाकरनं 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्य पदक मिळवलं. तर, मिश्र दुहेरीत मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी कांस्य पदक मिळवलं. तर, कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं देखील कांस्य पदकावर नाव कोरलं.
भारताचा टोक्यो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. या वेळी देखील त्याच्याकडून भारताला पदकाच्या आशा आहेत. याशिवाय भारताला हॉकीमध्ये कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे. भारत आणि स्पेनं यांच्यात कांस्य पदकासाठी लढत होणार आहे.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)