हॉकी संघावर दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव, पंतप्रधान म्हणाले हा नवा भारत, गंभीर म्हणाला, सगळे विश्वचषक विसरुन जा!
IND vs GER, Hockey Match : पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गजांनी भारतीय पुरुष हॉकी संघावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. भारताला आपल्या संघाचा गर्व आहे. हा नवा भारत आहे, असं मोदींनी म्हटलंय.
IND vs GER, Hockey Match : भारतीय हॉकी संघानं इतिहास रचत आक्रमक जर्मनीवर मात करत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केलं आहे. जर्मनीला 5-4 असं हरवत भारतानं विजय मिळवला. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गजांनी भारतीय पुरुष हॉकी संघावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे की, हा दिवस भारतीयांसाठी यादगार दिवस राहिल.
IND vs GER, Hockey Match : भारतीय हॉकी संघानं इतिहास रचला, कांस्यपदकावर शिक्कामोर्तब
पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे की, ऐतिहासिक! हा असा ऐतिहासिक दिवस आहे जो सदैव लक्षात राहील. कांस्य पदक जिंकलेल्या भारतीय संघाला खूप शुभेच्छा. भारताला आपल्या संघाचा गर्व आहे. हा नवा भारत आहे. आत्मविश्वासानं भरलेला भारत आहे, असं त्यांनी म्हटलंय.
प्रफुल्लित भारत! प्रेरित भारत! गर्वित भारत!
— Narendra Modi (@narendramodi) August 5, 2021
टोक्यो में हॉकी टीम की शानदार जीत पूरे देश के लिए गर्व का क्षण है।
ये नया भारत है, आत्मविश्वास से भरा भारत है।
हॉकी टीम को फिर से ढेरों बधाई और शुभकामनाएं। 🏑 #Tokyo2020
तर माजी क्रिकेटर आणि खासदार गौतम गंभीरनं म्हटलं आहे की, 1983, 2007 आणि 2011 चे वर्ल्डकप विसरुन जा. हे पदक कुठल्याही वर्ल्डकपपेक्षा मोठं आहे.
Forget 1983, 2007 or 2011, this medal in Hockey is bigger than any World Cup! #IndianHockeyMyPride 🇮🇳 pic.twitter.com/UZjfPwFHJJ
— Gautam Gambhir (@GautamGambhir) August 5, 2021
भारतासाठी सिमरनजीत सिंहने दोन, हरमनप्रीत सिंह, रुपिंदर पाल सिंह आणि हार्दिक सिंहनं प्रत्येक एक-एक गोल डागत सामन्यात जर्मनीवर मात करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली. भारताची सुरुवात काहीशी निराशाजनक होती. जर्मनीनं सामन्याच्या पहिल्या मिनिटालाच गोल डागल 1-0 नं आघाडी घेतली होती. जर्मनीच्या वतीनं तिमुर ओरुजनं गोल केला होता. भारताला पाचव्या मिनिटाला वापसी करण्याची संधी मिळाली. पण पेनल्टी कॉर्नवर गोल करण्यात रुपिंदर पाल सिंह अयशस्वी ठरला.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये टीम इंडियाची वापसी
भारतानं दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला धमाकेदार खेळी करत 17व्या मिनिटाला गोल डागला. सिमरनजीत सिंहनं हा गोल डागला आणि सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर जर्मनी आणखी आक्रमक होताना दिसली. लगेचच भारताना आणखी एक गोल डागत सामन्यात आघाडी घेतली. हार्दिक सिंहनं या सामन्यात भारताला वापसी मिळवून दिली आणि पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामन्यात 2-3 अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारतानं 28व्या मिनिटाला आणखी एक गोल डागत सामन्यात बरोबरी साधली.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतानं या सामन्यात पूर्णपणे जर्मनीवर दबाव बनवला होता. भारतानं या क्वार्टरमध्ये दोन गोल डागले. चौथा गोल 31व्या मिनिटाला रुपिंदर पाल सिंहनं आणि 34व्या मिनिटाला सिमरनजीत सिंहनं पाचवा गोल डागला. भारताना 5-3 अशी आघाडी घेतली. चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला जर्मनी काहीशी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. जर्मनीनं चौथा गोल डागत सामना 5-4 अशा उत्कंठावर्धक वळणावर आणला. पण वेळ संपली आणि जर्मनीचं कांस्य पदक मिळवण्याचं स्वप्न अधुरं राहिलं.