एक्स्प्लोर

Coronavirus : टोकियो ऑलिम्पिक लांबणीवर पडण्याची शक्यता

जगभरातील जवळपास सर्वच देश कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडले आहेत त्यामुळेच 2020 टोक्यो ऑलिम्पिक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असं जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी सांगितले.

नवी दिल्ली :  कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक क्रिडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत तर अनेक रद्द करण्यात आल्या आहेत. यादरम्यान क्रिकेट, फुटबॉल आणि बास्केटबॉलच्या सर्व महत्त्वाच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे आता कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भाव पाहता 2020 टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलणं जवळपास निश्चित झालं आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार ऑलिम्पिक नियोजित वेळेनुसार घेण्यावर ठाम असलेलं जपान सरकार आता ऑलिम्पिक पुढे ढकलण्याच्या विचारात आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी “सध्याची स्थिती पाहता ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन पुढे ढकललं जाण्याची शक्यता असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच  आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक्स समितीवरील वाढत्या दबावामुळे त्यांनी देखील मान्य केलं आहे की कोविड-19 च्या वाढत्या संकटामुळे टोक्यो ऑलिम्पिक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो”. तसेच जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी सांगितले की, 2020 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात खूप अडचणी येत आहेत. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी आम्ही लवकरच निर्णय घेऊ. 24 जुलै पासून या खेळाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सुद्धा सांगितलं आहे की, अशी परिस्थितीत ऑलिम्पिक खेळांना स्थगित केलं जाऊ शकतं. टोकियोमध्ये 24 जुलै ते 9 ऑगस्ट या दरम्यान ही ऑलिम्पिक स्पर्धा खेळावण्यात येणार आहे. पण आता ऑलिम्पिकचं आयोजन कोरोनाच्या सावटाखाली आलं आहे. करोनाच्या संकटामुळे स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलावे अशी मागणी विविध स्तरातून केली जात होती. अखेर आता जपान सरकार ही स्पर्धा पुढे ढकलण्याच्या विचारात आहे. दरम्यान ऑलिम्पिकमधून कॅनडापाठोपाठ आता ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा ऑलिम्पिक कमिटीनेही आपला संघ ऑलिम्पिकला न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. Corona Outbreak | अमेरिकेत 24 तासात 100 तर, इटलीत गेल्या 24 तासात 651 रुग्णांचा बळी दरम्यान जगभरातील जवळपास सर्वच देश कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडले आहेत. झपाट्याने पसरत असलेल्या या व्हायसर पुढे अमेरिका, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलियासारखे अनेक मोठे देश हतबल दिसत आहेत. वाढती कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहिल्यानंतर कुणाला वाचवायचं आणि कुणाला नाही, असा प्रश्न डॉक्टरांना पडत असल्याचं चित्र आहे. गेल्या पाच दिवसात जगभरात जवळपास साडेचार हजार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील ही आकडेवारी असली तरी ती भारतासाठी चिंतेंची बाब आहे. आपण जेवढा विचार करतोय त्यापेक्षा वेगाने हा व्हायरस पसरतो आहे. Sensex falls down | सेन्सेक्स 2600 अंकांनी कोसळला, निफ्टीतही 625 अंकांची घसरण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis : मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना जेलमध्ये टाकायचय..फडणवीस भर सभागृहात असं का म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 26 March 2025Uddhav Thackeray Video | उद्धव ठाकरे हरामखोर कुणाला म्हणाले? राम कदम यांची प्रतिक्रियाUddhav Thackeray : हरामखोर आहेत ते...उद्धव ठाकरेंचारोख कुणावर? पाहा संपूर्ण व्हिडीओ ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
Embed widget