Novak Djokovic : नोवाकचा पराक्रम, 23 वे ग्रँडस्लॅम जिंकत विश्वविक्रम, नदालला टाकले मागे
Novak Djokovic : आघाडीचा टेनिसपटू सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने फ्रेंच ओपन स्पर्धेवर नाव कोरलेय
Novak Djokovic : आघाडीचा टेनिसपटू सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने फ्रेंच ओपन स्पर्धेवर नाव कोरलेय. या जेतेपदासह सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा झालाय. जोकोविच याच्या नावावर आता 23 ग्रँड स्लॅम झाली आहेत. जोकोविच याने राफेल नदाल याला मागे टाकलेय. राफेल नदालच्या नावावर 22 ग्रँड स्लॅम जेतेपदे आहेत. तर रॉजर फेडरर याने 20 ग्रँडस्लॅम जिंकली आहेत.
सर्बियाच्या नोवाक जोकोविचने विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील मक्तेदारी पुन्हा दिमाखात सिद्ध केली. फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जोकोव्हिचने कॅस्पर रूड याचा पराभव केला. जोकोविच याचे एकूण 23 आणि तिसरे फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम आहे. चार ग्रँडस्लॅम तीन तीन वेळा जिंकणारा नोवाक एकमेव खेळाडू झालाय. दुसरीकडे चौथ्या क्रमांकावरील कॅस्पर रूड याचे पहिल्या ग्रँडस्लॅम विजयाचे स्वप्न भंगले. 36 वर्षीय नोवाक जोकोविचने फायनलमध्ये पहिल्या सेटपासून आपल्या खेळातील आक्रमकता दाखवली. तिन्ही सेट जोकोव्हिचने अगदी सहज जिंकले. जोकोविचसमोर कॅस्पर अतिशय कमकुवत जाणवत होता. जोकोविचने कॅस्पर रुड याला 7-6 (7-1), 6-3, 7-5 अशा तीन सेटमध्ये पराभूत केलेय.
जोकोविचचा फ्रान्स ओपनचा प्रवास
पहिल्या फेरीत कोवासेविक याचा 6-3, 6-2, 7-6 पराभव
दूसऱ्या फेरीत फुकसोविक्स याचा 7-6, 6-0, 6-3 पराभव
तिसऱ्या फेरीत फोकिना याचा 7-6, 7-6, 6-2 पराभव
चौथ्या फेरीत वरिलास याचा 6-3, 6-2, 6-2 पराभव
क्वार्टर फायनलमध्ये खचानोव याच्यावर 4-6, 7-6, 6-2, 6-4 विजय
सेमीफायनलमध्ये अल्कारेज याच्यावर 6-3, 5-7, 6-1, 6-1 विजय
फायनलमध्ये कॅस्पर रूड याला 7-6 (7-1), 6-3, 7-5 हरवले
Novak Djokovic beat Casper Ruud 7-6(1), 6-3, 7-5 to win a third French Open title and 23rd Grand Slam men’s singles title.
— ANI (@ANI) June 11, 2023
(Pic: Roland-Garros Twitter account) pic.twitter.com/GwLIKuId6W
जोकोविच के ग्रैंड स्लैम खिताब
ग्रँड स्लॅम | कोणते ग्रँडस्लॅम कधी जिंकले |
ऑस्ट्रेलियन ओपन | 2008, 2011, 2012, 2013, 2015, 2016, 2019, 2020, 2021, 2023 |
फ्रेंच ओपन | 2016, 2021, 2023 |
विम्बलडन ओपन | 2011, 2014, 2015, 2018, 2019, 2021, 2022 |
यूएस ओपन | 2011, 2015, 2018 |
नदालकडून जोकोविचचे अभिनंदन
जोकोविचच्या या विजायनंतर राफेल नदाल याने अभिनंदन केलेय. नदाल याने ट्वीट करत म्हटलेय की, या अद्भुत यशाबद्दल खूप खूप शुभेच्छा जोकोविच... 23 या संख्येबद्दल काही वर्षांपूर्वी विचार करणेही कठीण होते..पण तुम्ही करुन दाखवले... कुटुंब आणि सहकाऱ्यांसोबत या क्षणाचा आनंद घ्या..
Many congrats on this amazing achievement @DjokerNole
— Rafa Nadal (@RafaelNadal) June 11, 2023
23 is a number that just a few years back was imposible to think about, and you made it!
Enjoy it with your family and team! 👏🏻
फुटबॉल दिग्गज मैदानावर -
जोकोविच आणि रूड यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी फुटबॉलचे दिग्गज स्टेडिअमवर दाखल झाले होते. फ्रान्सचा स्टार खेळाडू किलियन एम्बाप्पे स्टेडियममध्ये दिसला होता. त्याशिवाय स्विडनचा ज्लातन इब्राहिमोविच यानेही उपस्थिती दर्शवली होती. हे दोन्ही दिग्गज खेळाडू क्लब स्तरावर फ्रान्सच्या पेरिस सेंट जर्मेनसाठी खेळले आहेत. इब्राहिमोविच याने नुकताच सन्यास घेतलाय.
✨ @KMbappe 🤝 @Ibra_official ✨#RolandGarros pic.twitter.com/utznU5I3rs
— Roland-Garros (@rolandgarros) June 11, 2023