New Captains of Sri Lanka : श्रीलंकेने वनडे, टी20 दोन्ही संघाचे नेतृत्व बदलले, 'या' दोन खेळाडूंची कर्णधारपदी वर्णी
New Captains of Sri Lanka : श्रीलंकन क्रिकेटने वनडे आणि टी20 च्या संघांमध्ये मोठे बदल केले आहेत. कुसल मेंडिस (Kusal Mendis) आणि वहिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) यांची श्रीलंकेच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
New Captains of Sri Lanka : श्रीलंकन क्रिकेटने वनडे आणि टी20 च्या संघांमध्ये मोठे बदल केले आहेत. कुसल मेंडिस (Kusal Mendis) आणि वहिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) यांची श्रीलंकेच्या कर्णधारपदी निवड करण्यात आलीय. श्रीलंका घरच्या मैदानावर झिम्बाब्वेविरोधात वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. या दोन्हीही मालिका 3 सामन्यांच्या असणार आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कुसल मेंडिस लंकेचे नेतृत्व करताना दिसेल. टी 20 मध्ये कर्णधारपदाची धुरा वहिंदू हसरंगा याच्यावर सोपवण्यात आली आहे. लंकेने झिम्बाब्वेविरोधातील मालिकांसाठी प्राथमिकरित्या संघाची घोषणा केली. हे संघ सध्या तरी प्राथमिकरित्या पाहिले जात आहेत. लंकेच्या निवड समितीने याबाबतचा निर्णय घेतला आहे. उपुल थरंगा यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीने हे निर्णय घेतले आहेत.
असलंका दोन्ही संघांचा उपकर्णधार
निवड समितीने चरिथ असलंका (Charith Aslanka) याच्यावर वनडे आणि टी20 च्या संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. झिम्बाब्वेविरोधातील मालिकेसाठी उपकर्णधाराचाही महत्वाचा रोल असणार आहे. या मालिकेला 6 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मालिकतील पहिला सामना कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येईल. मेंडिसने यापूर्वीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लंकेचे नेतृत्व केले आहे. मात्र, वहिंदू हसरंगाला नेतृत्व करण्याचा अनुभव नाही. त्यामुळे वहिंदू हसरंगासमोर कर्णधारपद संभाळतानाच चांगली कामगिरी करण्याचे आव्हान असणार आहे. भारतात खेळवण्यात आलेल्या वनडे वर्ल्डकपमधून दासुन शनाकाला दुखापत झाली होती. यानंतर मेंडिसकडे लंकेच्या नेतृत्वपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार होती.
Sri Lanka Cricket announced the preliminary squads for the Zimbabwe Tour of Sri Lanka 2024.
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) December 30, 2023
ODIs
Captain - Kusal Mendis
Vice Captain - Charith Asalanka
T20Is
Captain - Wanindu Hasaranga
Vice Captain - Charith Asalanka
READ: https://t.co/jFysJEoAKH#SLvZIM
एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंकेचा प्राथमिक संघ
कुसल मेंडिस (कर्णधार), चरिथ असलंका (उपकर्णधार), पथुम निसांका, अविष्का फरनँडो, सदिरा समरविक्रमा, सहान Arachchig, नविंदू फरनँडो, दासुन शनाका, कमिंदू मेंडिस, चमिका करुणारत्ने, जनिथ लियांगे, वहिंदू हसरंगा, महिश तिक्ष्णा, दिलशान मधुशंका, दुशमंथा चमिरा, दुनिथ Wellalage, प्रमोद मदुशान, असिथा फरनँडो, अकिला धनंजय, जेफ्री वँडरसे, चमिका गुणसकेरा
टी 20 मालिकेसाठी लंकचा प्राथमिक संघ
वहिंदू हसरंगा (कर्णधार), चरिथ असलंका (उपकर्णधार), पथुम निसांका, सदिरा समरविक्रमा, दासुन शनाका, कमिंदू मेंडिस, चमिका करुणारत्ने, कुसल मेंडिस, महिश तिक्ष्णा, दिलशान मदुशंका, दुशमंथा चमीरा, दुनिथ Wellalage, प्रमोद मदुशान, अकिला धनंजया, जॅफ्री वँडरसे, अँजलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, कुसल परेरा, भानुका राजपक्षे, कमिंदू मेंडिस, बिनंदू फरनँडो, नुवाण थुशारा, मथिशा पथिराणा
इतर महत्वाच्या बातम्या