एक्स्प्लोर

भारताचा गोल्डन बॉय बनला लेफ्टनंट कर्नल; राष्ट्रपतींकडून नीरज चोप्राला सैन्य दलात मोठी जबाबादारी

नीरज चोप्राने टोकिया येथील ऑलंपिक 2021 मध्ये जेवलिन थ्रो म्हणजे भाला फेक क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल जिंकले होते.

मुंबई : एकीकडे भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती निवळली असल्याने सीमारेषेवरील तणाव काहीसा कमी झाला आहे. मात्र, भारताची दहशवाद्यांविरुद्धची आणि पीओके संदर्भातील लढाई सुरूच राहणार आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिम बंद केली असून तात्पुरती स्थगित केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांशी संवाद साधताना स्पष्ट केले. दरम्यान, सैन्य दलाच्या कामगिरील पंतप्रधान नरेंद मोदींसह देशाच्या 140 कोटी नागरिकांनी सॅल्यूट केला आहे. सेलिब्रिटी, क्रिकेटर्स आणि दिग्गजांनी भारतीय सैन्य दलाचे कौतुक करत अभिमान व्यक्त केला आहे. आता, गोल्डन बॉय ऑलिंपिक विजेता नीरज चोप्राही (Neeraj chopra) त्याच भारतीय सैन्य दलाचा भाग होणार आहे. नीरज चोप्राला टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल पदाचा बहुमान देण्यात आला आहे. नीरज चोप्राने भाला फेंक प्रकारात उत्तुंग कामगिरी करत जगभरात तिरंगा फडकवला होता. आता, त्याला सैन्य दलाची वर्दी मिळणार आहे.  

नीरज चोप्राने टोकिया येथील ऑलंपिक 2021 मध्ये जेवलिन थ्रो म्हणजे भाला फेक क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल जिंकले होते. आता, नीरजला भारतीय सैन्य दलात लफ्टनंट कर्नल का पदाचा बहुमान देण्यात आला आहे. भारतीय टेरिटोरियल आर्मी रेग्युलेशन 1948 च्या Para-31 नुसार नीरज चोप्रा यांना भारतीय सैन्य दलात सहभागी करुन घेण्यात आलं आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नल पदी नियुक्ती देण्यात आली आहे. यापू्र्वी नीरज चोप्रा राजपूताना रायफल्समध्ये सुभेदार पदावर कार्यरत होते. सन 2016 साली ते नायब सुभेदार पदावर भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. आता, त्यांना बढती मिळाली असून थेट लेफ्टनंट कर्नल बनले आहेत. नीरजच्या अगोदरही काही खेळाडू टेरिटोरियल आर्मीचे घटक आहेत, त्यामध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हाही टेरिटोरियल आर्मीत लेफ्टनंट कर्नल आहे. दरम्यान, नीरज चोप्राने भारतासाठी 2021 च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्ण आणि 2024 च्या पॅरीस ऑलिंपिक स्पर्धेत सिल्व्हर पदक जिंकले आहे. नीरजने याच वर्षी टेनिस खेळाडू हिमानी मोर हिच्यासोबत लग्न केले. 

पहलगाम हल्ल्यानंतर नीरज चर्चेत

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नीरज चोप्राच्या एका सोशल मीडियावर पोस्टवरुन त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर,  मी सहसा खूप कमी बोलतो, परंतु जेव्हा माझ्या देशाच्या, माझ्या कुटुंबाच्या आणि सत्याचा प्रश्न येतो तेव्हा मी गप्प राहू शकत नाही, असे म्हणत नीरज चोप्राने स्पष्टीकरण दिलं होतं. पाकिस्तानचा भाला फेक पटू अर्शद नदीमला मी दिलेले निमंत्रण हे एका खेळाडूकडून दुसऱ्या खेळाडूला देण्यात आलेलं निमंत्रण होतं आणि त्याचा उद्देश भारताला जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे केंद्र बनवणे हा होता. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या दोन दिवस आधी सोमवारी सर्व खेळाडूंना या कार्यक्रमाची निमंत्रणे पाठविण्यात आली. या पोस्टमध्ये नीरजने स्पष्ट केले की, पहलगाम हल्ल्यानंतरच्या परिस्थितीमुळे अर्शदचा सहभाग रद्द करण्यात आला आहे. 'नीरज चोप्रा क्लासिक' कार्यक्रमात येण्यास अर्शदने नकार दिला होता हे लक्षात ठेवा, असंही नीरज चोप्राने म्हटलं आहे.

हेही वाचा

अमोल कोल्हे अन् जानकरांनी नाक घासून अजित दादांची माफी मागावी, मगच एकीची चर्चा; आ. मिटकरींनी ठेवली अट

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget