एक्स्प्लोर

National Carrom Championship 2022 : महाराष्ट्राची लेक आकांक्षाची दिल्लीत चमकदार कामगिरी, वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन कास्य पदकांची कमाई

National Carrom Championship 2022 : आंकाक्षा ही रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या असून तिने दिल्लीमध्ये झालेल्या 50 व्या वरिष्ठ नॅशनल कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन कांस्य पदकांवर नाव कोरलं आहे.

National Carrom Championship 2022 : महाराष्ट्राच्या संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या आकांक्षा उदय कदम (Aakanksha Kadam) हिने दिल्ली येथे झालेल्या 50 व्या वरिष्ठ नॅशनल कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेत (National Carrom Championship 2022) दोन कांस्य पदकांची (Two Bronze medal) कमाई करत दिल्लीत महाराष्ट्राचा झेंडा फडकावला आहे. यावेळी रश्मी कुमारीने सुवर्ण तर के नागतोतीने रौप्य पदक मिळवलं आहे. 

संगमेश्वर तालुक्यातील मूळच्या देवडे गावची असणारी आकांक्षा अवघ्या 17 वर्षांची आहे. पण तिची भरारी वाखाणण्याजोगी आहे. सध्या ती वरिष्ठ पातळीवरील कॅरम स्पर्धांमध्ये भाग घेऊन चांगल्या चांगल्या खेळाडूंना मात देऊन आपले वर्चस्व सिद्ध करत आहे. विशेष म्हणजे आकांक्षा ही सिनिअर गटात खेळणारी सर्वात लहान खेळाडू म्हणून सहभागी झाली होती‌. ती सध्या केंद्र सरकारच्या एअरपोर्ट अथॉरिटीकडून खेळाडू म्हणून खेळत असून तिने देशात वैयक्तिक कांस्य पदक मिळवल आहे. संघाला देखील कांस्य पदक मिळवून देण्यात तिचा सिंहाचा वाटा आहे.

आकांक्षा हीने या स्पर्धेत उत्तर प्रदेशची ममता कुमारी, चंदीगडची सानीया, निधी गुप्ता कर्नाटकची शायनी तसेच महाराष्ट्राची नीलम या नावाजलेल्या कॅरम पट्टूंना पराभूत करून विजय मिळवला आहे. आकांक्षा ही एक आंतरराष्ट्रीय कॅरमपट्टू असून मालदीव येथे झालेल्या कॅरम स्पर्धेत तिने पदार्पणातच देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले होते. त्यानंतर वाराणसी येथे झालेल्या कनिष्ठ गटाचीही ती विजेती आहे. मागील वर्षी वाराणसीत झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील (National Level Carrom Championships) वरिष्ठ कॅरम स्पर्धेत आकांक्षा आठव्या स्थानी होती. आजपर्यंत आकांक्षा हिने तब्बल सहा वेळा राज्यस्तरीय कॅरम स्पर्धांचे विजेतेपद पटकावले आहे. तर दोन वेळा तिला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले आहे.आतापर्यंत आकांक्षा ही ज्युनिअर गटातून सहा वेळा राष्ट्रीय स्तरावर खेळली असून या स्पर्धेत तिला दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी सहा पदकं मिळाली आहेत. आकांक्षाने कमी वयात कॅरम खेळामध्ये चांगलीच चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे एका छोट्या खेड्यातून येऊनही आकांक्षाने कॅरममध्ये चांगली भरारी घेतली आहे. आकांक्षाच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Mcoca : वाल्मीक कराडवर मकोका! पुढे काय कारवाई होणार? CID ला कोणते पुरावे मिळाले?Suresh Dhas On Walmik Karad Mcoca : कायदा कोणालाही सोडणार नाही, सुरेश धस यांची प्रतिक्रियाWalmik Karad Mcoca : वाल्मिक कराडवर मकोका, कराडच्या वकिलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3PM 14 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
Suresh Dhas on Walmik Karad MCOCA : अखेर वाल्मिक कराडवर मकोका, टीकेचे राण पेटवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अखेर वाल्मिक कराडांवर मकोका अंतर्गत गुन्हा, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Embed widget