एक्स्प्लोर

MCA कडून रोहित शर्माचा गौरव, वानखेडे स्टेडियममधील स्टँडला नाव देणार, शरद पवार, अजित वाडेकर यांच्या नावानं देखील स्टँड

Rohit Sharma : भारताला टी 20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवून देणाऱ्या कॅप्टन रोहित शर्माच्या नावानं वानखेडे स्टेडियवर स्टँड असेल.

Rohit Sharma Wankhede Stadium मुंबई: रोहित शर्मा हे नाव भारताच्या यशस्वी कर्णधारांच्या यादीत प्रामुख्यानं घेतलं जातं. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघानं टी 20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवली आहे. तर, वनडे वर्ल्ड कप आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. रोहित शर्माच्या या कामगिरीचा सन्मान म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशननं मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला  रोहित शर्माचं नाव दिलं जाणार आहे. 

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  रोहित शर्मासोबत शरद पवार आणि अजित वाडेकर यांचं नाव देखील देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

ग्रँड स्टँड लेवल 3 स्टँडला शरद पवार यांचं नाव दिलं जाईल. तर, ग्रँड स्टँड लेवल 4 ला अजित वाडेकर यांचं नाव दिलं जाईल. दिवेचा पॅवेलियन लेवल 3 रोहित शर्माचं नाव दिलं जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव मिलिंद नार्वेकर यांनी मांडले तर जितेंद्र आव्हाड यांनी त्याला अनुमोदन दिलं.

याबैठकीत एमसीएचे दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांना आदरांजली वाहण्यात आली. आता एमसीएस पॅव्हेलियनमधील मॅचडे ऑफिसं नाव बदलून एमएसीए ऑफिस लाउंज करण्यात आलं आहे.  

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे इतर निर्णय

मुंबई क्रिकेट असोसिएशनची 86 वी बैठक आज पार पडली. या बैठकीत मुंबईतील क्रिकेटच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली. मुंबई क्रिकेट क्लबशी संलग्न असलेल्या क्लबला दिला जाणारा निधी 75 कोटी करण्यात आला. पुढच्या काळात तो 100 कोटी करण्याचं धोरण स्वीकारण्यात आलं. मुंबईतील क्रिकेटच्या आणि त्यांसदर्भातील सोयी सुविधांच्या विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला. 

एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी आमचे आजचे निर्णय मुंबई क्रिकेटच्या आधारस्तंभांविषयी आदर दर्शवतात असं म्हटलं.

वानखेडेवर सचिन तेंडुलकरच्या नावे यापूर्वीच स्टँड

वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्या नावे यापूर्वीच स्टँड आहेत. दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर विराट कोहलीच्या नावे स्टँड आहे. कोलकाता येथे ईडन गार्डन्सवर सौरव गांगुलीच्या नावे स्टँड आहे.तर, बंगळुरुत राहुल द्रविडच्या नावे स्टँड आहे.

रोहित शर्मानं टीम इंडियाला ज्या प्रकारे टी 20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवून दिली आहे. त्याप्रमाणं मुंबई इंडियन्सला देखील पाच वेळा आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवून दिलं आहे. आता त्याचं नाव मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या स्टँडला दिलं जाणार आहे.    

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
Nagpur Leopard : नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
Nagpur Leopard : नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Bharat Gogawale VIDEO : शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब, शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ समोर
शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब, शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ समोर
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
Embed widget