MS Dhoni Suggestion For Pakistan Food : धोनी म्हणाला, जेवणासाठी एकदा पाकिस्तानला भेट दे; चाहत्याकडूनही अनपेक्षित सल्ल्यावर भन्नाट उत्तर!
MS Dhoni Suggestion For Pakistan Food : भारतीय संघाने 2006 मध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा केला होता, ज्यामध्ये धोनी भारतीय संघाचा भाग होता.
MS Dhoni Suggestion For Pakistan Food : महेंद्रसिंह धोनीला 'पाकिस्तानी फूड' आवडते का? याचे उत्तर बहुधा 'हो' असे असेल, कारण सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये माजी भारतीय कर्णधार धोनी एका चाहत्याला पाकिस्तानात जेवणासाठी जाण्याचा सल्ला देताना दिसत आहे. धोनीने भारतीय संघासोबत पाकिस्तानल दौरा केला आहे. तिथे त्याने पाकिस्तानी जेवणाचा आस्वाद घेतला. मात्र, धोनीने ज्या चाहत्याला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला होता, त्याने धोनीची ही सूचना मान्य केली नाही.
Thala Dhoni talks about Pakistani food and Says k Must visit once atleast to try out Food. Thala is love ❤️ , Thala fans Aag ki tarah share kro issy 💣#AUSvPAK || #PAKvAUS || #MSDhoni pic.twitter.com/UIRTKwRZnx
— Haris Arshad (@harris00071) December 29, 2023
व्हायरल व्हिडीओमध्ये धोनी म्हणतोय, 'तुम्ही एकदा पाकिस्तानात जाऊन जेवायला जा.' धोनीला उत्तर देताना तो चाहता म्हणतो, "त्याने चांगले जेवण सुचवले तरीही मी तिथे जाणार नाही. मला जेवण आवडते, पण मी तिथे जाणार नाही." व्हिडीओमध्ये दिसत आहे की, फॅन्सचे उत्तर ऐकून धोनी हसतो.
धोनी 2006 मध्ये टीम इंडियासोबत पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता
भारतीय संघाने 2006 मध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा केला होता, ज्यामध्ये धोनी भारतीय संघाचा भाग होता. धोनीने मालिकेतील दुसऱ्या कसोटीतील भारताच्या पहिल्या डावात 148 धावांची शानदार खेळी केली. याशिवाय, 2006 मध्ये, भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा केला होता, ज्यामध्ये धोनी देखील भारतीय संघाचा एक भाग होता.
بھارتی کھلاڑی ایم ایس دھونی پاکستانی کھانوں کے مداح۔
— صحرانورد (@Aadiiroy2) December 29, 2023
Indian player MS Dhoni is a fan of Pakistani food pic.twitter.com/faLCEm8a4u
चेन्नई सुपर किंग्जने 2023 मध्ये आयपीएल जिंकले होते
चेन्नई सुपर किंग्जने धोनीच्या नेतृत्वाखाली 2023 चे आयपीएल विजेतेपद जिंकले. 2023 पर्यंत चेन्नई पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनले होते. आता धोनी पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे. धोनी आयपीएल 2023 नंतर निवृत्त होईल अशी अटकळ याआधी वर्तवली जात होती, पण तसे झाले नाही.
Viral video of MS Dhoni suggesting Pakistani food has triggered indian extremists-cum-fans who are raising fingers on the nationalism of MS Dhoni. Feel pity for cricketing heroes of India who's loyalty is questioned by extremists-cum-fans everytime they speak good for Pakistan!🤦 pic.twitter.com/TPCUqBVBlM
— Arfa Feroz Zake (@ArfaSays_) December 29, 2023
इतर महत्वाच्या बातम्या