एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Cup 2019 IND vs NZ : मास्टर ब्लास्टरच्या पंक्तीत महेंद्रसिंग धोनी दाखल, 350 वन डे सामन्यांचा टप्पा पार
सर्वाधिक वन डे सामने खेळण्याच्या या टॉप 10 यादीमध्ये जगातील महेला जयवर्धने, सनथ जयसूर्या आणि कुमार संगकारा, शाहिद आफ्रिदी यांचा देखील समावेश आहे.
मॅन्चेस्टर : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने मॅन्चेस्टरमध्ये सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत दाखल झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड संघांमधला विश्वचषकाचा उपांत्य सामना हा धोनीचा 350वा वन डे सामना ठरला.
टीम इंडियाकडून 350वा सामन्यांचा पल्ला गाठणारा धोनी हा भारताचा दुसरा खेळाडू बनला आहे. तर जगातला नववा खेळाडू ठरला. याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 463 वन डे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
सर्वाधिक वन डे सामने खेळण्याच्या या यादीमध्ये महेला जयवर्धने, सनथ जयसूर्या आणि कुमार संगकारा, शाहिद आफ्रिदी, इनझमाम मुल हक् , रिकी पॉन्टिंग, वासिम अक्रम यांचा देखील समावेश आहे.
VIDEO | भारत-न्यूझीलंड सामन्यात पावसाचा व्यत्यय, न्यूझीलंडच्या 46.1 षटकात पाच बाद 211 धावा | ABP Majha
सर्वाधिक सामने खेळणारे टॉप 10 खेळाडू
सचिन तेंडुलकर - 463
महेला जयवर्धने – 448
सनथ जयसूर्या - 445
कुमार संगकारा - 404
शाहिद आफ्रिदी - 398
इनझमाम मुल हक् - 378
रिकी पॉन्टिंग - 375
वासिम अक्रम – 356
महेंद्रसिंग धोनी - 350
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement