एक्स्प्लोर
टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला टाकलं मागे
मुंबई : झिम्बाब्वे विरूद्ध झालेल्या टी२० सामन्य़ात भारतीय संघाने १० विकेट्सने विजय मिळवल्यानंतर टी २०मध्ये ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे.
सोमवारी झालेल्या सामन्यानंतर भारतीय संघाच्या विजयी मालिकेतील अकडा ४५वर पोहोचला आहे. भारतीय संघाने यासाठी ७५ सामने खेळले आहेत. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने ८८ टी२० सामन्यांपैकी ४४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
गेल्या दहा वर्षात टी२० च्या क्रमवारीत भारताआधी न्यूझीलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानचा क्रमांक आहे. जर भारताने तिसऱ्या टी २० सामन्यातही विजय मिळवला, तर न्यूझीलंड आणि श्रीलंका यांनाही मागे टाकून तिसऱ्या क्रमांक धडक मारण्याची शक्यता आहे.
टी २० सामन्यांमध्ये पाकिस्तान अव्वल स्थानावर असून पाकिस्तान क्रिकेट संघाने १०६ सामन्यांपैकी ६० सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसऱ्य़ा क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आहे. या संघाने ९१ सामन्यांपैकी ५४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement