एक्स्प्लोर
विराट आणि धवनने गांगुली-द्रविडचा विक्रम मोडला!
मुंबई : टीम इंडियाने शिखर धवन (78) आणि कर्णधार विराट कोहली (नाबाद 76) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट राखून मात केली. या विजयासोबत भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्याचं तिकीट बूक केलं आहे.
भारतीय गोलंदजांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव केवळ 191 धावांवर गुंडाळला. या आव्हानाचा पाठलाग भारतीय फलंदाजांनी 38 षटकांमध्येच म्हणजे 72 चेंडू राखून केला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसोबत गोलंदाजांचीही दाणादाण उडाली.
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचे फलंदाज विराट कोहली आणि शिखर धवन यांनी एक विक्रमही नावावर केला.
भारताकडून दुसऱ्या विकेटसाठी शंभरपेक्षा अधिक धावांची भागीदारी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट आणि शिखर धवन यांची जोडी दुसऱ्या स्थानावर आली आहे.
विराट आणि शिखर धवन यांची जोडी क्रिकेटच्या मैदानात सर्वात यशस्वी जोडींपैकी एक आहे. या जोडीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाचव्यांदा शतकी भागीदारी केली.
या यादीत टीम इंडियाचे माजी दिग्गज फलंदाज सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांची जोडी पहिल्या क्रमांकावर आहे. या जोडीने तब्बल 9 वेळा शतकी भागीदारी रचली आहे. मात्र सध्या भारताकडून खेळणाऱ्या फलंदाजांपैकी दुसऱ्या विकेटसाठी एवढी भागीदारी रचणारी ही पहिलीच जोडी आहे.
राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी भारताकडून दुसऱ्या विकेटसाठी एकूण 39 वेळा भागीदारी केली. यामध्ये 60.67 च्या सरासरीने 2 हजार 370 धावा रचल्या. तर 9 वेळा 100 किंवा त्यापेक्षा अधिक भागीदारी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement