एक्स्प्लोर
मोहम्मद आमिरचा मंदपणा, उत्साहाच्या भरात 'गेम प्लॅन' जाहीर
लंडन : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ भिडणार आहेत. मात्र या महामुकाबल्यापूर्वीच पाकिस्तानचा गेम प्लॅन लीक झाला आहे. पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमिरने त्याच्या संघाचा प्लॅन सार्वजनिक केला.
पाकिस्तान संघाच्या बैठकीत भारताच्या सुरुवातीच्या 2-3 विकेट लवकर घेण्याची रणनिती ठरवण्यात आली. संघ या विकेट घेण्यात यशस्वी झाला तर ठिक, नाही तर भारतीय फलंदाज 300 पेक्षा अधिक आव्हान देतील, जे पाकिस्तानसाठी आव्हानत्मक असेल, अशी चर्चा बैठकीत झाल्याचं मोहम्मद आमिरने सांगितलं.
पाकिस्तानच्या रणनितीचा प्रमुख विषय म्हणजे ते तीन फलंदाज सलामीवीर रोहित शर्मा, शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली हे आहेत. या तिन्ही फलंदाजांनी या मालिकेत दमदार फलंदाजी केली आहे.
पाकिस्तानच्या या रणनितीने टीम इंडियाच्या शिलेदारांना अगोदरच सावध केलं आहे. त्यामुळे हे तिन्हीही फलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये जपून खेळण्याचा प्रयत्न करतील.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील ब गटात यापूर्वी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती. रोहित शर्मा, शिखर धवन, विराट आणि युवराजने पाकिस्तानी फलंदाजांची जोरदार धुलाई केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement