एक्स्प्लोर

Mithali Raj : मितालीनं रचला इतिहास, 'हा' विक्रम करणारी जगातली पहिली महिला क्रिकेटर

Mithali Raj : भारतीय महिला एकदिवसीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं इतिहास रचला आहे. क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये मिळून 20 हजार धावांचा पल्ला गाठला आहे.

Mithali Raj : भारतीय महिला एकदिवसीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं इतिहास रचला आहे.  ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात मितालीनं 61 धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान तिनं एक नवा विक्रम केला आहे. मितालीनं क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये मिळून 20 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. हा विक्रम करणारी ती जगातील एकमेव महिला क्रिकेटर आहे.  

मिताली राजनं 217 एकदिवसीय सामन्यांमध्ये 7304 धावा केल्या आहेत. तर 11 कसोटी सामन्यांमध्ये 669 धावा केल्या आहेत. कसोटीत तिची सर्वाधिक धावसंख्या 214 आहे. याशिवाय 89 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मितालीने 2364 धावा केल्या आहेत.टी-20 फॉरमॅटमध्ये मितालीने 17 अर्धशतके झळकावली आहेत. स्थानिक क्रिकेटमध्ये देखील मितालीनं धावांचा पाऊस पाडला आहे. या सर्व प्रकारांमध्ये तिनं वीस हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तिच्या या विक्रमाबद्दल बीसीसीआयनं तिचं अभिनंदन केलं आहे.  

Mitali Raj Records: मिताली राजची अनोख्या विक्रमला गवसणी; श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला टाकलं मागे

मितालीची धमाकेदार खेळी सुरुच
मिताली राज सध्या महिला क्रिकेटरच्या आयसीसी रॅंकिंगमध्ये नंबर वनवर आहे.  मिताली राजने 1999 मध्ये भारतासाठी खेळायला सुरुवात केली. तिनं मागील 22 वर्षांमध्ये भारतासाठी जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं आहे.  

सर्वात जास्त काळ एकदिवसीय क्रिकेट कारकीर्द असलेली दुसरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर
भारतीय महिला किक्रेट संघाची माजी कर्णधार मिताली राज सर्वात जास्त काळ एकदिवसीय क्रिकेट कारकीर्द असलेली दुसरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ठरली आहे. याबाबतीत मितालीने श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू सनथ जयसूर्याला मागे टाकलं आहे. या यादीमध्ये भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. 

सचिन तेंडुलकरने डिसेंबर 1989 मध्ये क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. सचिनची एकदिवसीय क्रिकेट कारकीर्द 22 वर्ष आणि 91 दिवस होती. तर मिताली राजने जून 1999 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मिताली राजने 26 जून 1999 रोजी आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं होतं. मितालीची एकदिवसीय कारकीर्द सध्या 22 वर्षांची झाली आहे. सनथ जयसूर्याला मागे टाकत ती सर्वाधिक काळ एकदिवसीय क्रिकेट खेळणारी जगातील दुसरी क्रिकेटपटू ठरली आहे. सनथ जयसूर्याची एकदिवसीय कारकीर्द 21 वर्ष 184 दिवस एवढी होती.
 

 

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये टी 20  नंतर वनडे मालिका गमावली,  तीन खेळाडूंसाठी टीमची दारं बंद?
भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये वनडे मालिकेत पराभव, तीन खेळाडूंसाठी भारताची दारं बंद
Rohit Sharma Ind Vs Eng ODI: मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
Ferran Torres Story: वयाच्या सहाव्या वर्षी आजोबांच्या तालमीत प्रशिक्षण; घरच्या कुत्र्याला गोलकीपर बनवत सराव; विश्वचषकात स्पेनला विश्वचषक मिळवून देणारा फेरान टोरेस कोण?
वयाच्या सहाव्या वर्षी आजोबांच्या तालमीत प्रशिक्षण; घरच्या कुत्र्याला गोलकीपर बनवत सराव; विश्वचषकात स्पेनला विश्वचषक मिळवून देणारा फेरान टोरेस कोण?
Shubman Gill: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा पराभव, मालिकाही गमावली; कर्णधार शुभमन गिलने कोणाला ठरवले जबाबदार? रोहित-विराटबाबत म्हणाला...
लॉर्ड्सवर टीम इंडियाचा पराभव, मालिकाही गमावली; कर्णधार शुभमन गिलने कोणाला ठरवले जबाबदार? रोहित-विराटबाबत म्हणाला...

व्हिडीओ

NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Embed widget