Milkha Singh Health Update : महान धावपटू मिल्खा सिंह हॉस्पिटलमध्ये दाखल, चार दिवसांपूर्वी कोरोनाची लागण
Milkha Singh Corona Positive: भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचं 20 मे रोजी समोर आलं होतं. ते चंदीगडमध्ये आपल्या घरी आयसोलेट होते. मात्र आज त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे.
Milkha Singh Corona Positive: भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचं 20 मे रोजी समोर आलं होतं. ते चंदीगडमध्ये आपल्या घरी आयसोलेट होते. मात्र आज त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मोहालीच्या फोर्टिज हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. फ्लाइंग सिख नावानं प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंह यांचं वय 91 वर्ष आहे. त्यांच्या पत्नीनं त्यांना कोरोना झाला असल्याचं स्पष्ट केलं होतं.
माहितीनुसार मिल्खा सिंह यांच्या कुकला ताप आला होता. त्यानंतर मिल्खा सिंह यांनी आपली कोरोना चाचणी केली. चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर मिल्खा सिंह यांनी स्वत:ला घरात क्वारंटाईन केलं होतं.
मिल्खा सिंह यांनी सांगितलं आहे की, आमच्या घरातील काही हेल्पर पॉझिटीव्ह आले आहेत. त्यानंतर परिवारातील सर्व सदस्यांची आम्ही चाचणी केली. परिवारातील केवळ माझीच चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मी पूर्णपणे ठीक आहे, मला कुठलीही लक्षणं नाहीत. आमच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे की, मी तीन चार दिवसात ठीक होईल, असं मिल्खा सिंह यांनी गुरुवारी सांगितलं होतं.