(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MI vs DC IPL Final 2020 : संजय बांगर यांचा दिल्ली कॅपिटल्सला फायनलआधी खास सल्ला
MI vs DC IPL Final 2020: तेराव्या सीझनच्या याआधी दिल्ली आणि मुंबई यांच्या तीन सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी एक सामना दिल्लीने जिंकला तर दोनदा मुंबईने दिल्लीला पराभूत केलं.
MIvsDC, IPL 2020 Final : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे. आयपीएलची ट्रॉफी कोणता संघ हातात घेणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. दिल्ली कॅपिटल्स संघात प्रतिभावान खेळाडू आहेत आणि ते आयपीएल -13 चे ते विजेते होतील किंवा नाही हे आजच्या सामन्यानंतर ठरेल. मात्र दिल्ली संघाने आपले खेळाडू आपल्याकडे ठेवायला हवे. दिल्लीचा संघ आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत प्रथमच पोहोचला आहे. असून मंगळवारी संध्याकाळी विजेतेपदासाठी मुंबई इंडियन्सशी सामना करावा लागणार आहे.
संजय बांगर यांनी स्टार स्पोर्ट्स क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात सांगितले की, दिल्लीने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे प्रतिभावान खेळाडूंची एक शानदार टीम आहे आणि जेतेपद मिळवले किंवा नाही तरी त्यांनी त्यांच्याबरोबर राहावे. ते विजेतेपदाच्या जवळ येत आहेत. दिल्ली संघ व्यवस्थापनाने त्यांच्याकडे असलेल्या खेळाडूंवर जर तेवढाच आत्मविश्वास दाखवला तर मला वाटते की चॅम्पियनशिप त्यांच्या जवळपास आहे.
तेराव्या सीझनच्या याआधी दिल्ली आणि मुंबई यांच्या तीन सामने खेळवण्यात आले आहेत. दोन्ही संघांमध्ये लीग स्टेजआधी खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्सनी पराभव केला होता. पुढिल दोन सामन्यांमध्येही मुंबई इंडियन्स दिल्लीवर भारी पडल्याचं दिसून आलं आहे. लीग स्टेजच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा मुंबई इंडियन्सकडून 9 विकेट्सनी पराभव झाला.
क्वालिफायर वनमध्ये तर मुंबई इंडियन्सचा संघ सुरुवातीपासूनच दिल्ली कॅपिटल्सवर भारी पडला होता. मुंबईच्या विरोधात 201 धावांच लक्ष्य गाठताना दिल्लीने 0 च्या स्कोअरवरच तीन विकेट्स गमावले होते. मुंबई इंडियन्सने क्वालिफायर वनमध्ये दिल्लीचा 57 धावांनी पराभव करून फायनल्समध्ये जागा निर्माण केली.
दुबईमध्ये मुंबईचा रेकॉर्ड चांगला नाही
दिल्ली कॅपिटल्ससाठी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे, दुबईच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाला आतापर्यंत दुबईमध्ये खेळवण्यात आलेल्या 7 सामन्यांपैकी 5 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. तर केवळ दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहेत. मुंबईच्या तुलनेत दिल्लीच्या संघाने दुबईत आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या 10 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पाच सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
विजय मिळवण्याच मुंबई सर्वात पुढे
आयपीएलच्या इतिहासाबाबत बोलायचं झालं तर आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये 27 वेळा लढती झाल्या आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाने 27 सामन्यांपैकी 15 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 12 वेळा दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :