एक्स्प्लोर

संगकाराच्या सल्ल्यामुळे भारतावर विजय : मॅथ्यूज

लंडन : श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने दिलेला स्फूर्तिदायी मंत्र, चॅम्पियन्स ट्रॉफीत श्रीलंकेच्या टीम इंडियावरच्या विजयाचं गमक असल्याची प्रतिक्रिया श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजनं व्यक्त केली. संगकारा सध्या सरेकडून इंग्लिश कौंटीत खेळत असून, भारताविरुद्धच्या सामन्याआधी त्याने वेळ काढून श्रीलंकेच्या खेळाडूंशी संवाद साधला होता. संगकाराने खास मार्गदर्शन केलेल्या कुशल मेंडिसन या सामन्यात 89 धावांची खेळी उभारली. त्यामुळं श्रीलंकेच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना, अँजेलो मॅथ्यूज संगकाराचे आभार मानायला विसरला नाही. इंग्लिश खेळपट्ट्यांवर कशी फलंदाजी करायची असते, याचं तंत्र श्रीलंकेच्या फलंदाजांना समजावून दिलं. तोच श्रीलंकेच्या भारतावरच्या यशाचा मंत्र ठरला. चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेकडून हार स्वीकारावी लागली होती. पण गुरुवारच्या सामन्यात श्रीलंकेने भारताच्या 322 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. आजवरच्या इतिहासात श्रीलंकेने केलेला तो दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी पाठलाग ठरला. श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियावर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 322 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य दिलं होतं. पण श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीवर हल्लाबोल करून त्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. श्रीलंकेकडून गुणतिलका, कुशल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज यांनी अर्धशतकं झळकावली तर परेरा आणि गुणरत्नेनं ऐन मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत भारतावर दणदणीत विजय मिळवला. या पराभवामुळे भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीमधील प्रवास अधिक खडतर झाला आहे. सुरुवातीला भारताने फलंदाजी करत 321 धावा केल्या होत्या. शिखर धवनने झळकावलेलं शतक आणि त्यानं रोहित शर्मा, तसंच महेंद्रसिंग धोनीच्या साथीने रचलेल्या मोठ्या भागिदाऱ्यांनी टीम इंडियाला 50 षटकांत सहा बाद 321 धावांपर्यंत मजल मारता आली होती. या सामन्यात शिखर धवन आणि रोहित शर्मानं 138 धावांची सलामी देऊन भारतीय डावाचा पाया रचला होता. धवनने धोनीच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी रचून भारतीय डावाला आणखी मजबुती दिली होती. रोहितनं 79 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 78 धावांची खेळी केली होती. हा सामना गमावल्यानं टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. त्यामुळे आता भारतासाठी पुढचा सामना ‘करो वा मरो’ असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

रोहितसह विराट कोहलीची दमदार खेळी, पण लॉर्ड्सवर भारताचा पराभव, इंग्लंडने एकदिवसीय मालिका जिंकली 
रोहितसह विराट कोहलीची दमदार खेळी, पण लॉर्ड्सवर भारताचा पराभव, इंग्लंडने एकदिवसीय मालिका जिंकली 
लॉर्ड्सवर 388 धावांचा पाठलाग करणं शक्य? एकदिवसीय सामन्यात भारताने पाठलाग केलेली सर्वोच्च धावसंख्या किती?  
लॉर्ड्सवर 388 धावांचा पाठलाग करणं शक्य? एकदिवसीय सामन्यात भारताने पाठलाग केलेली सर्वोच्च धावसंख्या किती?  
लॉर्ड्सवर बेन डकेटची ऐतिहासिक खेळी, इंग्लंडने रचला धावांचा डोंगर, विजयासाठी भारतासमोर 388 धावांचं लक्ष्य  
लॉर्ड्सवर बेन डकेटची ऐतिहासिक खेळी, इंग्लंडने रचला धावांचा डोंगर, विजयासाठी भारतासमोर 388 धावांचं लक्ष्य  
PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget