एक्स्प्लोर

World Cup 2019 | सेमीफायनलसाठी शमी आणि जाडेजाला प्लेईंग इलेव्हनमध्ये घ्या : सचिन तेंडुलकर

ओल्ड ट्रॅफर्डवर मोहम्मद शमीचा अनुभव खूप चांगला आहे. त्यामुळे त्याला खेळवावं, अशी भावना सचिनने बोलून दाखवली. विराट कोहली देखील मोहम्मद शमीला खेळवण्यासाठी उत्सुक असेल, असेही सचिन म्हणाला.

लंडन : मास्टर  ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला प्लेईंग इलेव्हन  मध्ये घेण्याची भावना व्यक्त केली आहे. सचिन म्हणाला की, मी शमीला खेळवण्याचे समर्थन करतो. कारण याच मैदानावर शमीने वेस्ट इंडिज विरोधात जबरदस्त कामगिरी केली होती.  ओल्ड ट्रॅफर्डवर मोहम्मद शमीचा अनुभव खूप चांगला आहे. त्यामुळे त्याला खेळवावं, अशी भावना सचिनने बोलून दाखवली. विराट कोहली देखील मोहम्मद शमीला खेळवण्यासाठी उत्सुक असेल, असेही सचिन म्हणाला. सोबतच सचिनने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला देखील अंतिम 11 मध्ये समाविष्ट करावे असा सल्ला दिला आहे. सचिन म्हणाला की, जाडेजा एक चांगला पर्याय आहे. जर दिनेश कार्तिक नंबर सातवर फलंदाजी करू शकतो तर जाडेजा देखील या जागी चांगला पर्याय आहे. मोठ्या सामन्यात आपल्याला एका कव्हरची गरज असते कारण आपण केवळ पाच गोलंदाजांसह खेळत आहोत. यासाठी जाडेजा एक चांगला पर्याय आहे, असे सचिन म्हणाला. सेमीफायनलसाठी प्लेईंग इलेव्हन निवडणे टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण सगळेच खेळाडू उत्तम प्रदर्शन करत असल्याने कुणाला घ्यायचंहा पेच निर्माण झाला आहे. अशा स्थितीत मास्टर ब्लास्टरचा हा सल्ला कॅप्टन ऐकणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. World Cup 2019 | न्यूझीलंडला धूळ चारुन टीम इंडिया फायनलचं तिकीट मिळवणार? टीम इंडियाने विश्वचषकाच्या साखळी सामन्यात सात सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. तर न्यूझीलंडनं अकरा गुणांसह टॉप फोरमध्ये आपली जागा निश्चित केली. त्यामुळे आता मॅन्चेस्टरमध्ये हे दोन्ही संघ फायनलच्या तिकिटासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. उपांत्य फेरीत आघाडीची मजबूत फळी आणि प्रभावी आक्रमण ही विराटच्या टीम इंडियाची जमेची बाजू आहे. कर्णधार विराटसह रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने यंदाच्या विश्वचषकात धावांचा रतीब घातला आहे. फलंदाजांच्या या कामगिरीला भारतीय आक्रमणानेही तेवढीच मोलाची साथ दिली आहे. बुमरा, शमी आणि भुवनेश्वर या वेगवान आक्रमणासह यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादवच्या मनगटी फिरकीनं प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवली आहे. हार्दिकची अष्टपैलू कामगिरीही टीम इंडियासाठी मोलाची ठरली आहे. दुसरीकडे विल्यमसनच्या फौजेनंही सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. या संघात कर्णधार विल्यमसन, मार्टिन गप्टिल, कॉलीन मन्रो, रॉस टेलरसारख्या अनुभवी शिलेदारांचा समावेश आहे. तर ट्रेन्ट बोल्ट, मॅट हेन्री, जीमी निशाम आणि लॉकी फर्ग्युसन या किवी आक्रमणाने विश्वचषकाच्या मैदानात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीतलं न्यूझीलंडचं आव्हान टीम इंडियासाठी नक्कीच सोपं नाही, याची जाणीव विराट आणि भारतीय संघव्यवस्थापनाला आहे. भारत आणि न्यूझीलंड विश्वचषकाच्या इतिहासात आजवर सात वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात चार वेळा न्यूझीलंडने तर तीन वेळा भारताने बाजी मारली आहे. विजय-पराजयाचं हे समीकरण काहीसं न्यूझीलंडच्या बाजूनं झुकलेलं आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडिया हे समीकरण बरोबरीत सोडवून फायनलचं तिकीट मिळवणार? की विल्यमसन आणि कंपनी अंडर 19 विश्वचषकातल्या त्या पराभवाचा वचपा काढणार याचीच आता उत्सुकता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : आगामी येवला विधानसभा मीच लढणार, छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण, कारण सांगत म्हणाले..
आगामी येवला विधानसभा मीच लढणार, छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण, कारण सांगत म्हणाले..
Mumbai Crime: 'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
Ajit Pawar: धडाधड निर्णय, खटाखट योजनांची घोषणा; पण निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार 10 मिनिटांत उठून गेले
धडाधड निर्णय, खटाखट योजनांची घोषणा; पण अजितदादा मंत्रिमंडळ बैठकीतून 10 मिनिटांत उठून गेले
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Dasara Melava : जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी 200 एकरवर पार्किंगVidarbha Vidhansabha Election : विदर्भात काँग्रेसच्या जागांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दावाABP Majha Headlines : 9 AM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :11 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : आगामी येवला विधानसभा मीच लढणार, छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण, कारण सांगत म्हणाले..
आगामी येवला विधानसभा मीच लढणार, छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण, कारण सांगत म्हणाले..
Mumbai Crime: 'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
Ajit Pawar: धडाधड निर्णय, खटाखट योजनांची घोषणा; पण निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार 10 मिनिटांत उठून गेले
धडाधड निर्णय, खटाखट योजनांची घोषणा; पण अजितदादा मंत्रिमंडळ बैठकीतून 10 मिनिटांत उठून गेले
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
"मी माझ्या बायकोला 'या' सुपरस्टारसोबत बेडरुममध्ये रंगेहात पकडलं"; सेलिब्रिटीचा आत्मचरित्रात खळबळजनक दावा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Embed widget