एक्स्प्लोर
भारत-ऑस्ट्रेलिया सराव सामना, पहिल्याच दिवशी मार्श, स्मिथची शतकं
मुंबई : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि शॉन मार्श या दोघांनीही सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी वैयक्तिक शतकं ठोकून, आपण भारत दौऱ्यातल्या कसोटी मालिकेसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं.
ऑस्ट्रेलिया आणि भारत 'अ' संघांमधला तीनदिवसीय सराव सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियानं पाच बाद 327 धावांची मजल मारली.
कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि शॉन मार्शने तिसऱ्या विकेटसाठी 156 धावांची भागीदारी रचून त्यात मोलाचं योगदान दिलं. स्मिथने 12 चौकार आणि एका षटकारासह 107 धावांची, तर शॉन मार्शने 11 चौकार आणि एका षटकारासह 104 धावांची खेळी उभारली. पीटर हॅण्डसकोम्बनेही 45 धावांची खेळी रचून, कसोटी मालिकेची उत्तम पूर्वतयारी करून घेतली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 23 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेचा भाग म्हणूनच उभय संघांमध्ये सराव सामना खेळवण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
अश्विनविरुद्धचा 'गेम प्लॅन' तयार : वॉर्नर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement