एक्स्प्लोर
Advertisement
धोनीचा नवा उद्योग, रांचीत दुकानाचं उद्घाटन
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर फावल्या वेळेत महेंद्रसिंह धोनीने एक नवा उद्योग हाती घेतला आहे.
रांची : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर फावल्या वेळेत महेंद्रसिंह धोनीने एक नवा उद्योग हाती घेतला आहे. ‘सेव्हन’ या नावाने धोनीने स्पोर्ट्सवेअरची नवीन रेंज बाजारात आणली आहे.
रांची येथील न्यूक्लियस मॉलमध्ये धोनीच्या दुकानाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. यावेळी धोनीने आपला खास फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. शूज, खेळाशी संबंधित सामुग्री आणि इतर वस्तू या दुकानात मिळतील.
अशाप्रकारचे आऊटलेट संपूर्ण देशभरात सुरु करण्यात येणार आहेत. वर्षअखेरपर्यंत सुमारे 20 ते 25 आणखी आऊटलेट उघडले जातील. तर 2020 पर्यंत देशात यांची संख्या वाढून जवळपास 275 केली जाईल, असंही धोनीने सांगितलं. दरम्याने महेंद्रसिंह धोनी आता थेट श्रीलंकेविरुद्ध वन-डे आणि एकमेव ट्वेण्टी-20 सामन्यासाठी श्रीलंकेला रवाना होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement