Sikandar Shaikh Arrested : हमाली करून कमावलंय, हरामाचा पैसा शिवणार नाही, हिंद केसरी खेळू नये म्हणून डाव, सिकंदरच्या वडिलांचा खळबळजनक आरोप
महाराष्ट्र केसरी किताबाचा मान पटकावणारा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करणारा पैलवान सिकंदर शेख अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अडकला आहे.

Sikandar Shaikh Arrested Father Rashid Shaikh First Reaction : महाराष्ट्र केसरी (Maharshtra kesari) किताबाचा मान पटकावणारा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करणारा पैलवान सिकंदर शेख (Sikandar Shaikh Arrested) अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अडकला आहे. पंजाब पोलिसांनी राजस्थानातील पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याच्या संशयावरून सिकंदर शेखला अटक केली आहे. या घटनेमुळे कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
पंजाब पोलिसांच्या तपासानुसार, शस्त्र तस्करी प्रकरणात सिकंदर शेखचा सहभाग असल्याचे पुरावे समोर आले आहेत. यानंतर कोल्हापूरच्या गंगावेश तालीम घडलेल्या सिकंदर शेखला अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणावर सिकंदरचे वडील, पैलवान रशीद शेख (Sikandar Shaikh Father Rashid Shaikh) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भावनिक शब्दांत मुलावर झालेल्या कारवाईबद्दल संताप व्यक्त केला आहे.
सिकंदरचे वडील पैलवान रशीद शेख काय म्हणाले? (Rashid Shaikh First Reaction)
“माझ्या मुलाने अत्यंत कष्टाने नाव कमावले आहे, कोणी तरी फसवून त्याला या प्रकरणात गुतवलं आहे. मी आयुष्यभर हमाली करून कमावलेत, मीच हरामचा पैसा कमावला नाही तर माझा मुलगा हरामची कमाई कसा कमवेल?” असं रशीद शेख यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले की, “सिकंदरला शेकडो गडा, गाड्या आणि सैन्यात नोकरी करण्याची संधी मिळाली. त्याला अशा प्रकारचं काही करण्याची गरजच नव्हती. हिंद केसरी स्पर्धा जवळ आली आहे, तो तयारी करत होता. त्याला खेळू न देण्यासाठी हे काही डावपेच तर नाहीत ना, हे मला समजत नाही.”
रशीद शेख यांनी अखेरीस विनंती केली की, “पंजाब आणि महाराष्ट्र पोलिसांनी आमच्या मुलावर अन्याय होऊ देऊ नये. त्याची सखोल चौकशी करावी आणि तो निर्दोष असल्यास त्याला मुक्त करावं.” दरम्यान, या प्रकरणाची चौकशी पंजाब पोलिसांच्या सीआयए युनिटकडून सुरू असून, सिकंदर शेखच्या अटकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.
खरंतर, सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे. सीआयए (CIA) पथकाने पपला गुर्जर गँगला शस्त्र पुरवणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड करत चार जणांना अटक केली असून त्यात सिकंदर शेखचाही समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 99 हजार रुपये रोख रक्कम, 5 पिस्तुलं, काही काडतुसे आणि स्कॉर्पिओ-एन व एक्सयूव्ही अशा दोन गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पंजाबमधील खरड येथील पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा -

























