एक्स्प्लोर

Maharashtra Kesari 2020 : गतविजेता बाला रफिक शेख आणि उपविजेता अभिजीत कटके स्पर्धेबाहेर

महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात माती विभागाच्या उपांत्य फेरीत सोलापूरच्या माऊली जमदाडेनं धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. माऊलीने महाराष्ट्र केसरीचा गतविजेता बाला रफिक शेख याला चितपट करुन माती विभागाची अंतिम फेरी गाठली आहे.

पुणे : महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात माती विभागाच्या उपांत्य फेरीत सोलापूरच्या माऊली जमदाडेनं धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. माऊलीने महाराष्ट्र केसरीचा गतविजेता बाला रफिक शेख याला चितपट करुन माती विभागाची अंतिम फेरी गाठली आहे.

या लढतीत बाला रफिक शेख पहिल्या मिनिटाला 2-0 असा आघाडीवर होता. पण दुसऱ्याच मिनिटाला माऊलीने हप्ते डावावर बाला रफिकला चितपट करत यंदाच्या स्पर्धेतला धक्कादायक निकाल नोंदवला. बालाला चितपट करणारा माऊली जमदाडे हा मूळचा सोलापूरचा असून तो कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत सराव करतो.

दरम्यान, महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात अजून एक धक्कादायक निकाल पाहायला मिळाला आहे. बाला रफिक पाठोपाठ गतउपविजेता आणि 2018 च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता अभिजीत कटकेचंसुद्धा महाराष्ट्र केसरीमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

मॅट विभागाच्या अंतिम फेरीत अभिजीतला नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आहे. सलग चौथ्यांदा महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढण्याच्या इराद्यानं मॅटवर उतरलेल्या अभिजीतला हर्षवर्धनं 5-2 अशा फरकानं हरवून सनसनाटी विजयाची नोंद केली आहे.

हर्षवर्धन सदगीर हा या स्पर्धेत नाशिककडून खेळतो पण तो अर्जुनवीर काका पवारांचा चेला असून पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संरकुलात सराव करतो. दरम्यान या दोन धक्कादायक निकालांमुळे यंदा महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात नवा पैलवाना मानाची चांदीची गदा उंचावणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

WI vs PAK 1st Test : बाबर आजम फक्त पाहतच राहिला... डोळ्यांसमोर पाकिस्तानचा पुन्हा एकदा झाला गेम! वेस्ट इंडिजने मैदान मारलं
बाबर आजम फक्त पाहतच राहिला... डोळ्यांसमोर पाकिस्तानचा पुन्हा एकदा झाला गेम! वेस्ट इंडिजने मैदान मारलं
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Who Is Subhadeep Ghosh : कधीही खेळला नाही आंतरराष्ट्रीय सामना, आता बनणार टीम इंडियाचा फील्डिंग कोच; कोण आहे शुभदीप घोष?
कधीही खेळला नाही आंतरराष्ट्रीय सामना, आता बनणार टीम इंडियाचा फील्डिंग कोच; कोण आहे शुभदीप घोष?
क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र OUT; टिचकी वाजवली अन् अंपायर फसवला, इंग्लंडमध्ये सामन्यात असा प्रकार घडला की जगभरात VIDEO व्हायरल
क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र OUT; टिचकी वाजवली अन् अंपायर फसवला, इंग्लंडमध्ये सामन्यात असा प्रकार घडला की जगभरात VIDEO व्हायरल

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Embed widget