एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
INDvsAUS : अखेरच्या कसोटीत टॉस जिंकून भारताची प्रथम फलंदाजी
दोन्ही संघातल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-1 अशा आघाडीवर आहे.
सिडनी : भारत ऑणि ऑस्ट्रेलिया संघांमधला अखेरचा कसोटी सामना सिडनीत खेळवण्यात येत आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. दहा धावसंख्येवरच संघाला लोकेश राहुलच्या रुपात पहिला धक्का बसला. सध्या चेतेश्वर पुजारा आणि मयांक अग्रवाल मैदानावर आहेत. दोघांनी 50 धावांची भागीदारीही रचली.
भारतीय वेळेनुसार आज पहाटे पाच वाजता सामन्याला सुरुवात झाली. उभय संघातल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-1 अशा आघाडीवर आहे.
राहुल पुन्हा अपयशी
टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुल पुन्हा एकदा अपयशी ठरला. केवळ नऊ धावा करुन तो बाद झाला. जॉश हेझलवुडने त्याला माघारी धाडलं. फॉर्ममध्ये नसल्याने त्याला तिसऱ्या कसोटीतून वगळण्यात आलं होतं. आजच्या सामन्यात त्याला मोठी धावसंख्या करण्याची संधी होती. परंतु तो पुन्हा एकदा फ्लॉप ठरला.
दोन फिरकीपटूंचा समावेश
या सामन्यासाठी भारतीय संघात दोन फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे. दुखापतीमुळे बाहेर झालेल्या ईशांत शर्माच्या जागी कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे. तर लोकेश राहुलचं संघात पुनरागमन झालं आहे. रोहित शर्माला दुखापत झाल्याने राहुलला संघात जागा मिळाली आहे.
कसोटी मालिका विजयाचा निर्धार
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन भूमीवर आतापर्यंत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. 1948 पासून आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये ऑस्ट्रेलियात खेळवण्यात आलेल्या अकरापैकी आठ मालिका कांगारुंनी जिंकल्या तर आहेत तीन मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. त्यामुळे विराट कोहलीच्या टीम इंडियाचा सिडनी कसोटीत मालिका विजयाचा निर्धार केला असेल.
...तर कोहली गांगुलीचा विक्रम मोडेल!
भारताने हा कसोटी सामना जिंकला तर कर्णधार म्हणून विराट कोहलीचा परदेशी भूमीवर हा बारावा विजय असेल. यासोबतच तो माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रमही मोडेल.
भारतीय संघ : लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement