एक्स्प्लोर
12 तासात दोन देशात दोन सामने आणि 10 विकेट्स, लसिथ मलिंगाची दमदार कामगिरी
क्रिकेटचं वेडच असं असतं की एखादा खेळाडू केवळ 12 तासांमध्ये दोन वेगवेगळ्या देशांमध्ये दोन वेगवेगळे सामने खेळून दमदार कामगिरी करु शकतो. श्रीलंकेचा जलगदती गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा स्टार लसिथ मलिंगाने हा पराक्रम केला आहे.
मुंबई : श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगाने 12 तासांच्या आत वेगवेगळ्या देशांमध्ये एक ट्वेण्टी 20 आणि एक 50 षटकांचा सामना खेळला.
मलिंगाने बुधवारी चेन्नई सुपर किंग्जविरोधात आयपीएलमधील सामना खेळला आणि मग त्याने श्रीलंकेच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 50 षटकांच्या एका सामन्यात सहभागी झाला होता.
मुंबईसाठी मलिंगाने दमदार गोलंदाजी करत 34 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. तर गुरुवारी सकाळी कँडीसाठी रवाना झाला. तिथे त्याने सुपर फोर टूर्नामेंटमध्ये जलवा दाखवला.
VIDEO | विश्वचषक विजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनी वानखेडे स्टेडियमवर | खेळ माझा | मुंबई | एबीपी माझा
मलिंगाने या सामन्यातही दमदार गोलंदाजी केली आणि अ यादीत आपली सर्वोत्कृष्ट कामगिरीही केली. त्याने 49 धावांच्या मोबदल्यात सात विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे त्याने 12 तासातच एकूण दहा विकेट्स आपल्या नावावर केल्या.
त्याच्या कामगिरीमुळे गॉलने कँडीला 156 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केलं.
श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) मलिंगाला एप्रिल महिन्यात आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली होती, पण तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळला.
VIDEO | क्रिकेटपटू श्रीसंतवरील आजीवन बंदी हटवली | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement