Lalit Modi on N Srinivasan Fixing IPL : लंडनला पळालेल्या ललित मोदीच्या विधानाने आयपीएल हादरले, पंचांकडून फिक्सिंग केल्याचा संघ मालकावर आरोप
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक ललित मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Lalit Modi Accused N Srinivasan Fixing IPL : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक ललित मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याने आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) मालक एन श्रीनिवासन यांच्यावर फिक्सिंगचे गंभीर आरोप केले आहेत.
श्रीनिवासन हे बीसीसीआयचे माजी अध्यक्षही राहिले आहे आणि ललित मोदींसोबतचे त्यांचे मतभेद कोणापासून लपलेले नाहीत. आता एका पॉडकास्टवर चर्चा करताना ललित मोदींनी CSK मालकावर अम्पायर फिक्सिंगचा आरोप केला आहे. या व्हायरल पॉडकास्टवर ललित मोदींनी सांगितले की, एन श्रीनिवासन चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यांमध्ये पंचांची अदलाबदल करत होते.
ललित मोदींनी म्हणाले की, "श्रीनिवासन यांनी पंच बदलण्याचे कामही केले, तो सीएसके सामन्यांमध्ये त्यांच्या पंचांना काम द्यायचा. मला हे आवडले नाही कारण तो उघडपणे फिक्सिंग करत होता. जेव्हा मी त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तो माझ्या विरुद्ध गेला."
अँड्र्यू फ्लिंटॉफच्या वादावर ललित मोदींनी केलं मोठं वक्तव्य
अँड्र्यू फ्लिंटॉफच्या वादावर ललित मोदींनी पुन्हा मोठं वक्तव्य केलं आहे. खरं तर, CSK चे मालक एन श्रीनिवासन यांच्यावर आयपीएल 2009 च्या लिलावात अँड्र्यू फ्लिंटॉफला विकत घेण्यासाठी लिलाव फिक्स केल्याचा आरोप आहे. ललितने पुन्हा हा विषय काढला आणि सांगितले की, श्रीनिवासन यांना फ्लिंटॉफला विकत घ्यायचे होते आणि प्रत्येक फ्रँचायझीला त्यांनी केलेल्या फिक्सिंगची माहिती होती.
Lalit Modi told, CSK owner Srinivasan did :
— Veena Jain (@DrJain21) November 27, 2024
> IPL Auction rigging
> Got his desired players by fixing other franchises
> Fixed Umpires for CSK matches
All these things seems True for MI & Ambani also, but no one talks enough about it! #IPLAuction pic.twitter.com/CUtVZTo0fr
आयपीएल 2025 चा मेगा लिलाव रविवार आणि सोमवारी जेद्दाह सौदी अरेबिया येथे झाला. या कालावधीत सर्व 10 संघांनी एकूण 639.15 कोटी रुपये खर्च करून 182 खेळाडूंना खरेदी केले. मात्र, लिलावासाठी 577 खेळाडूंची नावे निश्चित करण्यात आली होती. अशा स्थितीत अनेक स्टार खेळाडू होते ज्यांना लिलावात कोणीही खरेदीदार मिळाला नाही.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
