All England Badminton Championships 2023: लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांचा धमाका; दोघांचीही विजयी सुरुवात
All England Badminton Championships: ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धमाकेदार खेळी करत लक्ष्य सेन (Lakshya Sen) आणि एचएस प्रणॉय (HS Prannoy) यांनी विजयी सुरुवात केली आहे.
All England Badminton Championships 2023: भारताच्या लक्ष्य सेन (Lakshya Sen) आणि एचएस प्रणॉय (HS Prannoy) यांनी ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेच्या (All England Badminton Championships 2023) पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धमाकेदार खेळी करत विजय मिळवला आहे. सेनने पहिल्या फेरीत चीनच्या तैपेईच्या चौ तिएन चेनला 48 मिनिटांत 21-18, 21-19 अशा फरकाने पराभूत केलं. उत्तराखंड येथील अल्मोडामधील 21 वर्षांच्या लक्ष्यचा जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूविरोधात हा पहिला विजय आहे. याआधी त्याला टीएन चेनविरुद्ध दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता.
जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या प्रणॉयनं चीनच्या तैपेईच्या झू वेई वांगचा 49 मिनिटांत 21-19, 22-20 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयासह प्रणॉयचा वांगविरुद्धचा विजय-पराजयाचा विक्रम 5-3 असा झाला आहे. केरळच्या 30 वर्षीय प्रणॉयचा पुढील सामना इंडोनेशियाच्या तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अँथनी सिनिसुका गिंटिंगशी होणार आहे. तर लक्ष्य पुढील फेरीत अँडर्स अँटोन्सन आणि रॅस्मस गेमके यांच्यातील सामन्यात जो विजयी होईल त्याच्याशी भिडणार आहे.
प्रणॉयनं पहिल्या गेमच्या ब्रेकपर्यंत सलग पाच गुण घेत 11-4 अशी आघाडी घेतली. मात्र नंतर वांगनं 11-14 अशी आघाडी घेतली होती. प्रणॉयनं सलग चार गुण घेत 18-12 अशी आघाडी घेतली. पण वांगनं प्रणयच्या कमकुवतपणाचा फायदा घेत पुन्हा 16-19 अशी आघाडी घेतली. त्यानंतर प्रणॉयनं फटकेदार स्कोअर 19-19 असा बरोबरीत आणला. प्रणॉयनं क्रॉस कोर्ट स्मॅशसह गेम पॉइंट मिळवला आणि त्यानंतर दुसरा स्मॅश करून पहिला गेम जिंकला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
2026 FIFA वर्ल्ड कपचा नवा फॉरमॅट; 4-4 टीम्सचे 12 ग्रुप, तर 48 टीम खेळणार