KXIP vs KKR : के एल राहुलची झुंज अपयशी; पंजाबचा 2 धावांनी पराभव, कोलकाताचा आणखी एक विजय
KXIP vs KKR : किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) या दोन संघातील आजचा सामना शेख जायद स्टेडियम, अबू धाबीमध्ये खेळला गेला. या सामन्यात कोलकाताने पंजाबवर दोन धावांनी विजय मिळवला.
IPL 2020 KXIP vs KKR : पंजाबचा कर्णधार के एल राहुलची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर 2 धावांनी मात केली आहे. पंजाबच्या सलामीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. मात्र, सलामीची जोडी वगळता कोणालाही चांगली खेळी करता आली नाही. परिणामी सहज साध्य वाटणारा विजयाचा घास कोलकाताच्या गोलंदाजांनी हिरावून घेतला.
कोलकाता नाईट रायडर्सने दिलेलं 165 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबची सुरुवात दमदार झाली. कर्णधार के एल राहुल आणि मयांक अगरवाल यांनी तुफान फटकेबाजी करत मोठी भागिदारी रचली. दोघांनीही दिमाखदार अर्धशतक झळकावली. मयांकने 39 चेंडूत सहा चौकार आणि एक षटकाराच्या सहाय्याने 56 धावा काढल्या. त्यानंतर आलेल्या निकोलस पुरन लवकर माघारी परतला. निकोलस 16 धावांवर आऊट झाला. पाठोपाठ सिमरन सिंहने देखील 4 धावांवर झेलबाद झाला. कोलकाताच्या गोलंदाजांना पहिलं यश मिळवायला बराच वेळ लागला असला तरी अखेरच्या षटकात त्यांनी टिच्चून मारा केला. कोलकाताकडून प्रसिद्धि कृष्णने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर सुनील नारायणने दोन फलंदाजांना माघारी पाठवले.
IPL 2020 : पराभवानंतर राजस्थानसाठी दिलासादायक बातमी, 'या' स्टार खेळाडूची संघात एन्ट्री
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून कर्णधार दिनेश कार्तिकने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, सुरुवातीलाचं केकेआरला मोठे झटके बसले. राहुल त्रिपाठी 4 धावांवर तर नितीश राणा 2 धावांवर माघारी परतला. त्यानंतर गिल आणि मॉर्गन या दोघांनी चांगली भागीदारी करत डाव सावरला. मॉर्गनने 23 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार खेचत 24 धावा केल्या. मग गिल आणि कर्णधार कार्तिक यांना कोलकाताच्या डावाला आकार दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 43 चेंडूत 82 धावांची भागीदारी केली. गिल 57 धावांवर बाद झाला. पाठोपाठ आंद्रे रसेलही 5 धावांवर माघारी परतला. कार्तिक मात्र शेवटपर्यंत मैदानात उभा होता. त्याने 29 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. पंजाबकडून मोहम्मद शमी, बिश्नोई आणि सिंग यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. कोलकाताने 20 षटकात 6 गडी गमावत 164 धावांचं लक्ष्य उभारलं आहे.
महेंद्रसिंह धोनीच्या परिवारासंदर्भात अभद्र ट्रोलिंग, क्रिकेटर्ससह अनेकांचा संताप