(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2020 : पराभवानंतर राजस्थानसाठी दिलासादायक बातमी, 'या' स्टार खेळाडूची संघात एन्ट्री
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध काल शुक्रवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात 46 धावांनी पराभवाचा सामना राजस्थानला करावा लागला. राजस्थानचा हा चौथा पराभव आहे. मात्र आता राजस्थानसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे टीमचा स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्स रविवारच्या सामन्यात खेळणार आहे.
IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सच्या पराभवाची मालिका सुरुच आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध काल शुक्रवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात 46 धावांनी पराभवाचा सामना राजस्थानला करावा लागला. राजस्थानचा हा चौथा पराभव आहे. मात्र आता राजस्थानसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे टीमचा स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्स रविवारच्या सामन्यात खेळणार आहे. राजस्थानचा कप्तान स्टीव्ह स्मिथनं बेन स्टोक्स 11 ऑक्टोबरच्या सामन्यात खेळणार असल्याची माहिती दिली आहे. रविवारी राजस्थान रॉयल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादसोबत होणार आहे. बेन स्टोक्सचा क्वारंटाईन काळ शनिवारी पूर्ण होणार आहे. स्टीव्ह स्मिथनं सांगितलं की, बेन स्टोक्सचा क्वारंटाईन काळ पूर्ण झाला आहे. शनिवारी त्याचा हा काळ पूर्ण होतोय. रविवारी आम्हाला मैदानात उतरायचं आहे. स्टोक्सने सराव केलेला नाही मात्र आम्ही त्यासाठी त्याच्याशी चर्चा केली आहे. दिल्ली कॅपिटल्ससोबत झालेल्या पराभवानंतर स्मिथने नाराजी व्यक्त केली आहे. दबावात रणनीतीनुसार खेळू शकलो नसल्याचं त्यानं म्हटलं. चार पराभव आणि दोन विजयांसह राजस्थान गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. दिल्लीचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, गुणतालिकेत प्रथम स्थान
आयपीएलमध्ये काल दिल्लीने राजस्थानवर 'रॉयल' विजय मिळवत गुणतालिकेत प्रथम स्थान मिळवलं आहे. दिल्ली कॅपिटल्सने दिलेलं 185 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ 19.4 षटकात 138 धावांवर आटोपला. दिल्लीचं 185 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरुवात चांगली झाली. सलामीला आलेले यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी सुरुवातीला काही फटके मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, यशस्वी जयस्वाल 34 धावांवर तर बटलर 13 धावांवर माघारी परतले. त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, तोही 24 धावांवर बाद झाला. त्यानंतर राहुल तेवातिया वगळता कोणालाही दोन अंकी धावसंख्या उभारता आली नाही. दिल्लीकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक तीन गडी बाद केले. रविचंद्रन अश्विन आणि मार्कस स्टोइनीस यांनी प्रत्येकी दोन तर ऑनरीच नॉर्टजे, हर्षल पटेल आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक गडी बाद केला. विशेष म्हणजे आज दिल्लीच्या प्रत्येक गोलंदाजाने विकेट काढली.
IPL 2020 : आयपीएलमधील रेकॉर्ड किंग डेविड वॉर्नर; कोहली-रोहितलाही टाकलं मागे
राजस्थानविरूद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने 20 षटकांत 184 धावांचे लक्ष्य उभारले. सुरुवातीला लवकर खराब सुरुवात झाल्यानंतरही शिमरॉन हेटमायर आणि मार्कस स्टॉयनीस या दोन फलंदाजींनी चांगली खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.
तत्पूर्वी, दिल्लीची सुरुवात अडखळत झाली. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ हे दोघेही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. आर्चरने धवनला 5 धावांवर तर पृथ्वी शॉला 19 धावांवर माघारी धाडले. सलामीवीर बाद झाल्यावर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर डाव सावरतील असं वाटत असताना अय्यर 17 चेंडूत 22 धावा काढून बाद झाला. अय्यर बाद झाल्यानंतर ऋषभ पंतदेखील लगेचच धावबाद झाला. त्यानंतर मार्कस स्टॉयनीसने धमाकेदार खेळी केली. त्याने 4 षटकारांसह 30 चेंडूत 39 धावा जमवल्या. तर शिमरॉन हेटमायरनेही तुफान फलंदाजी केली. त्याने 24 चेंडूत 5 षटकारांच्या सहाय्यने 45 धावा केल्या. त्यानंतर अक्षर पटेलने शेवटी येऊन फटकेबाजी केली. अक्षरने 8 चेंडूत 17 धावांची खेळी करत संघाला 180 उभारण्यात मदत केली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने टिच्चून गोलंदाजी करत केवळ 24 धावा देत 3 गडी बाद केले. तर कार्तिक त्यागी, अँड्र्यू टाई आणि राहुल तेवातिया यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.