IPL 2020, KKRvsKXIP: कोलकातासमोर पंजाबचा विजयरथ रोखण्याचं आव्हान, प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी पंजाबची धडपड
कोलकाताने आतापर्यंत 11 सामने खेळले असून 6 सामने जिंकले. दुसरीकडे, पंजाबने आतापर्यंत 11 पैकी 5 सामने जिंकले आहेत. कोलकाता पॉईंट टेबलमध्ये चौथ्या आणि पंजाब पाचव्या स्थानावर आहे.
![IPL 2020, KKRvsKXIP: कोलकातासमोर पंजाबचा विजयरथ रोखण्याचं आव्हान, प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी पंजाबची धडपड kkr vs kxip ipl 2020 kolkatas challenge to stop punjabs victory chariot IPL 2020, KKRvsKXIP: कोलकातासमोर पंजाबचा विजयरथ रोखण्याचं आव्हान, प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी पंजाबची धडपड](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/26233540/KKRvsKXIP.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2020, KKRvsKXIP : आयपीएलमध्ये सोमवारी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना होणार आहे. या मोसमातील 46 व्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते. दोन्ही संघांसाठी प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना जिंकणे फार महत्वाचे आहे. आजच्या सामन्यात पराभव झाल्यास किंग्ज इलेव्हन पंजाब स्पर्धेतून बाहेर पडेल. कोलकाताने आतापर्यंत 11 सामने खेळले असून 6 सामने जिंकले. दुसरीकडे, पंजाबने आतापर्यंत 11 पैकी 5 सामने जिंकले आहेत. कोलकाता पॉईंट टेबलमध्ये चौथ्या आणि पंजाब पाचव्या स्थानावर आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या अखेरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटलचा 59 धावांनी पराभव केला. या सामन्यात वरुण चक्रवर्तीने 5 विकेट्स घेत संघाला मजबूत स्थानावर नेले. त्यापूर्वी कोलकाताची टीम बंगलोरविरुद्धच्या सामन्यात 84 धावा करु शकली होती. आतापर्यंत संघाच्या फलंदाजांची कामगिरी चांगली राहिलेली नाही. शेवटच्या सामन्यात नितीश राणाने 81 धावा आणि सुनील नरेनने 64 धावा केल्या. संघाच्या फलंदाजांनी कामगिरी अद्यापही निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबची आक्रमक गोलंदाजी कोलकाताला अडचणीत आणू शकते.
जिंकलंस भावा! मैदानात गुडघ्यावर बसून हार्दिक पांड्याची #BlackLivesMatter आंदोलनाला साथ
पंजाबची मजबूत फलंदाजी जमेची बाजू
शेवटच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने सनरायझर्स हैदराबादचा 12 धावांनी पराभव केला. पंजाबची या हंगामाची सुरुवात चांगली झाली नसली तरी आता पंजाबने विजयाचा वेग पकडला. शेवटचे 4 सामने जिंकल्याने त्यांची प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची आशा कायम आहे. पंजाबची फलंदाजी खूप मजबूत आहे. कर्णधार केएल राहुल, ख्रिस गेल, निकोलस पुरन, मयंक अगरवाल यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. राहुलने सुरुवातीपासूनच ऑरेंज कॅप कायम आपल्याकडे ठेवली आहे. या मोसमातील 11 सामन्यात त्याने 567 धावांची नोंद केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)