एक्स्प्लोर
कोलकात्याची हैदराबादवर मात, प्लेऑफचं तिकीट बूक
कोलकात्याने सनरायझर्स हैदराबादचा पाच विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या गुणतालिकेत तिसरं स्थान मिळवलं. कोलकात्याचा हा चौदा सामन्यांमधला आठवा विजय ठरला.
हैदराबाद : दिनेश कार्तिकचा कोलकाता नाईट रायडर्स हा आयपीएलच्या प्ले ऑफचं तिकीट बूक करणारा तिसरा संघ ठरला. कोलकात्याने सनरायझर्स हैदराबादचा पाच विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या गुणतालिकेत तिसरं स्थान मिळवलं.
कोलकात्याचा हा चौदा सामन्यांमधला आठवा विजय ठरला. या सामन्यात हैदराबादने कोलकात्याला विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं होतं. कोलकात्याने दोन चेंडू आणि पाच विकेट्स राखून हैदराबादने दिलेलं लक्ष्य गाठलं.
सलामीच्या ख्रिस लिनने 55 धावांची आणि रॉबिन उथाप्पाने 45 धावांची खेळी करून कोलकात्याच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सुनील नारायणने 29 आणि दिनेश कार्तिकने नाबाद 26 धावांची खेळी केली.
त्याआधी, प्रसिद्ध कृष्णाने चार विकेट्स घेऊन हैदराबादला नऊ बाद 172 असं रोखलं होतं.
मुंबई इंडियन्स प्लेऑफचं तिकीट मिळवणार?
सध्या गुणतालिकेवर नजर टाकली, तर मुंबई इंडियन्स पाचव्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सने काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केल्यामुळे त्यांच्या खात्यात आणखी दोन गुण जमा झाले आणि चौथ्या स्थानावर झेप घेतली. मुंबईचा मुकाबला आज श्रेयस अय्यरच्या दिल्ली डेअरडेव्हिल्ससोबत होणार आहे. दिल्लीतल्या फिरोजशाह कोटला मैदानावर दुपारी चार वाजता खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात मुंबईला विजय अत्यावश्यक आहे.
दिल्लीचं आव्हान अगोदरच संपुष्टात आलं असून दिल्लीचा संघ गुणतालिकेत आठ गुणांसह सर्वात तळाला आहे. मुंबईने आज विजय मिळवून आणखी दोन गुण मिळवले, तर मुंबईचा संघ चौथ्या स्थानावर येईल. शिवाय प्लेऑफचा मार्गही मोकळा होईल. कारण, मुंबईचं नेट रनरेट राजस्थान रॉयल्सपेक्षा अधिक आहे.
पंजाबचं काय होणार?
दुसरीकडे चेन्नई सुपरकिंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना रंगणार आहे. या आयपीएल मोसमाची धडाकेबाज सुरुवात करणारा पंजाबचा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. पंजाबने 13 पैकी सहा सामने जिंकले आहेत. मात्र गेल्या काही सामन्यातील सततच्या पराभवामुळे पंजाबच्या अडचणी वाढल्या. पंजाबचं नेट रनरेट पाहता प्लेऑफचा मार्ग कठीण दिसत आहे. हा सामना रात्री आठ वाजता खेळवण्यात येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement