एक्स्प्लोर
लोखंडी पिंजऱ्यात कुस्ती, किरण भगत वि. मनजीतसिंग भिडणार
स्वातंत्र्यानंतर लोखंडी पिंजऱ्यात खेळवण्यात येणारी ही पहिलीच कुस्ती ठरणार आहे. स्वातंत्र्याआधी भारतात लोखंडी पिंजऱ्यात निकाली कुस्ती खेळण्याची पद्धत रूढ होती.

सांगली : ‘महाराष्ट्र केसरी’त पराभूत झालेला पैलवान किरण भगत पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात उतरणार आहे. सांगलीत पैलवान मनजीतसिंग आणि किरण भगतची कुस्ती होणार आहे. विशेष म्हणजे, लोखंडी पिंजऱ्यात ही कुस्ती होणार आहे. महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान मारुती जाधव यांच्या संकल्पनेतून 18 जानेवारीला सांगलीत पैलवान-कुस्तीप्रेमी संघटनेची स्थापना होत आहे. उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत आणि बेल्जियममध्ये सराव करणारा भारतीय पैलवान मनजीतसिंग यांच्यामधली निकाली कुस्ती या कार्यक्रमाचं आकर्षण ठरणार आहे. ही कुस्ती लोखंडी पिंजऱ्यात खेळवण्यात येणार आहे. स्वातंत्र्यानंतर लोखंडी पिंजऱ्यात खेळवण्यात येणारी ही पहिलीच कुस्ती ठरणार आहे. स्वातंत्र्याआधी भारतात लोखंडी पिंजऱ्यात निकाली कुस्ती खेळण्याची पद्धत रूढ होती. पैलवान-कुस्तीप्रेमी संघटनेच्या सांगलीतल्या स्थापनेनिमित्तानं त्या परंपरेचं पुनरुज्जीवन होणार आहे. या कार्यक्रमाला छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजी राजे आणि संभाजी भिडे गुरुजी उपस्थित राहणार आहेत. पाहा बातमीचा व्हिडीओ :
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग























