एक्स्प्लोर

केदारचं शतक ही भारतीयाने वनडेत ठोकलेली पाचवी फास्टेस्ट सेंच्युरी

पुणे : पुणे वनडेमध्ये कोहलीच्या नेतृत्वात खेळला गेलेला पहिला सामना भारताने खिशात घातला. मात्र विराटला खंबीर साथ लाभली ती मराठमोळ्या केदार जाधवची. सर्वात जलद शतक ठोकणारा केदार हा सहावाच भारतीय फलंदाज ठरला आहे. कौतुकाची गोष्ट म्हणजे अवघ्या 13 वनडे सामन्यांचा अनुभव असतानाच त्याने ही मजल मारली आहे. 11 बॉल्स बाकी असतानाच विजय पुण्याच्या वनडे सामन्यामध्ये साहेबांवर टीम इंडियाने दुहेरी हल्लाबोल केला. एकीकडे विराट कोहली तुफान फटकेबाजी करत होता, तर दुसरी कडे जाधवचा धमा'केदार' मारा सुरु होता. इंग्लंडने समोर ठेवलेल्या 351 धावांचा डोंगर पार केला तरी 11 बॉल शिल्लक राहिले होते. विराट आणि केदारची शानदार शतकं विराट कोहलीने 105 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 5 षटकार ठोकत 122 धावा ठोकल्या. तर केदार जाधवने अवघ्या 76 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 4 षटकार लगावून 120 धावा रचल्या. केदारच्या तडाखेबाज खेळीमुळे टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचली. वनडे मध्ये विराट कोहलीचं हे 27 वं शतक होतं, तर केदार जाधवचं हे दुसरंच! आश्चर्याची गोष्ट म्हणजे केदार फॉर्ममध्ये आला की शतकच ठोकतो. त्याने वनडेमध्ये आतापर्यंत फक्त शतकी खेळीच केली आहे. त्याच्या नावे एकही अर्धशतक नाही. विराट-केदारची भागीदारी पाचव्या विकेटसाठी विराट आणि केदारने दोनशे धावांची भागीदारी केली. केदारने अवघ्या 29 धावांत अर्धशतक पूर्ण केलं, तर 65 चेंडूंमध्ये शतकाचा उंबरठा ओलांडला. 158 च्या स्ट्राईक रेटने केदार खेळत होता. पायाच्या दुखापतीने उचल खाल्ल्यामुळे केदारला धावतानाही त्रास होत होता. अखेर 120 धावांवर तो झेलबाद झाला, मात्र टीम इंडियाचा विजय तोपर्यंत निश्चित झाला होता. सामन्यानंतर कोहलीची स्तुतिसुमनं मॅचनंतर कर्णधार कोहलीने केदार जाधववर स्तुतिसुमनं उधळली. केदारच्या शतकानंतर कोहलीने त्याला दिलेली कौतुकाची थाप प्रेक्षकांच्या कायमची स्मरणात राहील. 2019 च्या विश्वचषकासाठी मोहऱ्यांची जुळवाजुळव करताना कोहलीची केदार विशेष मेहेरनजर असेल, अशी अटकळ बांधली जात आहे.

संबंधित बातम्या :

पुणे वन डेत विराटची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी

भारताकडून दुसऱ्यांदा 350 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rinku Singh: उत्तर प्रदेशात रिंकू सिंहला स्पेशल गिफ्ट पण ते स्वीकारण्यासाठी गेलाच नाही! कार्यक्रमात तोच धागा पकडत सीएम योगी नेमकं काय म्हणाले?
उत्तर प्रदेशात रिंकू सिंहला स्पेशल गिफ्ट पण ते स्वीकारण्यासाठी गेलाच नाही! कार्यक्रमात तोच धागा पकडत सीएम योगी नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
BCCI Schedule Update : रोहित शर्मा-विराट कोहली मैदानात कधी दिसणार? टीम इंडियाचे वर्षभराचे दौरे ठरले, BCCI कडून टाईमटेबल जारी
रोहित शर्मा-विराट कोहली मैदानात कधी दिसणार? टीम इंडियाचे वर्षभराचे दौरे ठरले, BCCI कडून टाईमटेबल जारी
Shane Warne: राजस्थान रॉयल्सला आयपीएल जिंकून देणाऱ्या दिवंगत शेन वॉर्नचा 20 वर्षांपूर्वीचा तो एक निर्णय अन् आता कुटुंबाला तब्बल 460 कोटी रुपये मिळणार!
राजस्थान रॉयल्सला आयपीएल जिंकून देणाऱ्या दिवंगत शेन वॉर्नचा 20 वर्षांपूर्वीचा तो एक निर्णय अन् आता कुटुंबाला तब्बल 460 कोटी रुपये मिळणार!

व्हिडीओ

Ashok Kharat Cheat Businessman : खरात भुकेला, कुबेर भिकेला; क्राईम फाईल्सचा नव अंक Special Report
Rohit Pawar On Sunil Tatkare :तटकरे-पटेलांनी आयोगाला पत्र देऊन पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न केला
Sushma Andhare On Shital Mhatre : अशोक खरातवरुन सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रेंमध्ये ट्वीटरवॉर
Sushma Andhare on Sheetal Mhatre : खरातला पाणी देण्यासाठी रुपाली चाकणकरांची शिफारस, मग बंदूक कुणी दिली?
Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rinku Singh: उत्तर प्रदेशात रिंकू सिंहला स्पेशल गिफ्ट पण ते स्वीकारण्यासाठी गेलाच नाही! कार्यक्रमात तोच धागा पकडत सीएम योगी नेमकं काय म्हणाले?
उत्तर प्रदेशात रिंकू सिंहला स्पेशल गिफ्ट पण ते स्वीकारण्यासाठी गेलाच नाही! कार्यक्रमात तोच धागा पकडत सीएम योगी नेमकं काय म्हणाले?
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी
पेट्रोल खरेदीवर 200 रुपयांची मर्यादा नाही, सरकारचं स्पष्टीकरण; कलेक्टर म्हणाले, अफवा पसरवू नका
पेट्रोल खरेदीवर 200 रुपयांची मर्यादा नाही, सरकारचं स्पष्टीकरण; कलेक्टर म्हणाले, अफवा पसरवू नका
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
Income Tax Update : 1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू; PAN, ITR ते जेवणाच्या कार्डपर्यंत काय बदल? जाणून घ्या
1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू; PAN, ITR ते जेवणाच्या कार्डपर्यंत काय बदल? जाणून घ्या
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
...तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही; व्हायरल व्हिडिओवर रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, तटकरेंनाही टोला

Embed widget