Rohit Sharma : हिटमॅन रोहितनं जगाला धडकी भरवली, पण रबाडासमोर सपशेल नांगी! 'या' तीन गोलंदाजांकडून आतापर्यंत सर्वाधिक 'शिकार'
Rohit Sharma : सेंच्युरियनमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीद्वारे रबाडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13व्यांदा रोहित शर्माला बाद केले. तर टीम साऊदीने 12 वेळा भारतीय कर्णधाराला बाद केले आहे.
Kagiso Rabada Record Against Rohit Sharma : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मासाठी (Kagiso Rabada Record Against Rohit Sharma) कायम काळ बनून आला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियनमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत रबाडाने रोहितला 5 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर बाद केले. रोहित शर्माच्या या विकेटसह रबाडा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधाराला सर्वाधिक बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. रबाडाने न्यूझीलंडच्या टीम साऊथीचा विक्रम मोडला आहे.
सेंच्युरियनमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीद्वारे रबाडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13व्यांदा रोहित शर्माला बाद केले. तर टीम साऊदीने 12 वेळा भारतीय कर्णधाराला बाद केले आहे. या यादीत श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज तिसऱ्या क्रमांकावर आहे. मॅथ्यूजने रोहित शर्माला एकूण 10 वेळा बाद केले आहे. रबाडाने कसोटीत सहाव्यांदा रोहित शर्माची विकेट घेतली.
Indian batting coach said "Pull shot is the shot Rohit has scored lots of runs, he believes in - this is his shot, some days it will come off, some days it won't - another day, he will hit a six & we have heard people say he is the best puller, we are okay, management is backing… pic.twitter.com/jxcO3FfUd3
— Johns. (@CricCrazyJohns) December 26, 2023
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या गोलंदाजांनी रोहित शर्माला सर्वात जास्त बाद केले
कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) – 13 वेळा
टिम साउथी (न्यूझीलंड) – 12 वेळा
अँजेलो मॅथ्यूज (श्रीलंका) – 10 वेळा
एकदिवसीय विश्वचषकानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच मैदानात
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अंतिम सामना हरल्यानंतर रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत प्रथमच क्रिकेटच्या मैदानावर दिसला. विश्वचषकानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली. त्यानंतर आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाने यजमान संघाविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळली. विश्वचषकानंतर, भारतीय कर्णधार रोहित शर्मा सर्व T20 आणि एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचा भाग नव्हता. सूर्यकुमार यादवने टी-20 आणि केएल राहुलने वनडेमध्ये भारताची कमान सांभाळली.
Vikram Rathour said, "Rohit has scored a lot of runs on the pull shot, it's his shot.
— Vishal. (@SPORTYVISHAL) December 26, 2023
Some day it will come, some day not. That didn't come today but Rohit is backing that shot.
On another day he would hit a six we've heard people saying he's the best puller in the world". pic.twitter.com/uh04DOHQhR
कसोटीच्या पहिल्या दिवशी 208/8 धावा केल्या
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने पहिल्या दिवसअखेर 8 विकेट गमावत 208 धावा केल्या आहेत. दिवसअखेरीस केएल राहुल 70 धावांवर नाबाद राहिला, जी संघाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती.
इतर महत्वाच्या बातम्या