एक्स्प्लोर

John Cena : शेवटच्या सामन्यात टॅप आऊट, डोळ्यात अश्रू पण चेहऱ्यावर हसू; WWE विश्वातून जॉन सीना निवृत्त

John Cena WWE Retirement : रेसलिंग विश्वात तब्बल 17 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकणारा जॉन सीनाने WWE विश्वातून निवृत्ती जाहीर केली आहे. दोन दशकाहून अधिक काळाचा प्रवास त्याने थांबवण्याचा निर्णय घेतला.

मुंबई : 'नेव्हर गिव्ह अप' असं म्हणत अवघ्या जगाला दोन दशकांहून जास्त काळ वेड लावणाऱ्या जॉन सीनानं (John Cena) अखेर गिव्ह अप केलं. पण, हे गिव्ह अप, करताना त्याच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात अश्रू होते. वॉशिंग्टनमध्ये पार पडलेल्या सॅटर्डे नाईट मेन इव्हेंटमधला सामना (Saturday Night’s Main Event) हा जॉन सीनाच्या रेसलिंग कारकीर्दीचा शेवटचा सामना होता.

गेल्या वर्षी जुलै महिन्यातच जॉन सीनानं WWE विश्वातून निवृत्त होणार अशी घोषणा केली होती. तेव्हापासूनच जॉन सीनाची फेअरवेल सीरिज सुरु झाली. वर्षभरात अनेक देशांमध्ये सामने खेळल्यानंतर वॉशिंग्टन डीसीच्या कॅपिटन वन स्टेडियममध्ये जॉन सीनाची शेवटची मॅच झाली.

रेसलिंग विश्वात जवळपास सगळेचं विश्वविक्रम मोडणारा, हॉलिवूडमध्येही अभिनयातून आपलं कसब दाखवणारा ग्लोबल आयकॉन अशी जॉन सीनाची ओळख बनली. 23 वर्षांच्या कारकीर्दीत जॉन सीनानं 2,320 सामने खेळले. त्यापैकी एक हजार 818 सामने जिंकले.

John Cena WWE Record : जॉन सिनाचा विश्वविक्रम

वर्ल्ड चॅम्पियन्सशीप - 17 वेळा

यू. एस. चॅम्पियन्सशीप - 5 वेळा

टॅग टीम चॅम्पियन्सशीप - 4 वेळा

रॉयल रम्बल विजेता - 2 वेळा

इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियन्सशीप - 1 वेळा विजयी.

John Cena Matches History : अनेक सामने जिंकत विक्रम

कर्ट अँकलपासून अंडरटेकरपर्यंत, शॉन मायकलपासून ब्रॉक लेसन्सरपर्यंत, सीएम फंकपासून रँडी ऑर्टनपर्यंत... इतकंच नाही तर अगदी अलीकडच्या काळातील रेसलर्स असलेल्या रोमन रिंग्जपासून कोडी ऱ्होड्सपर्यंत... जॉन सीनानं अशा अनेक चॅम्पियन्सला हरवत, एकापाठोपाठ एक सामना जिंकत, विक्रमांच्या पायऱ्या चढल्या.

John Cena Hollywood Movies : हॉलिवूडमध्येही सुपरस्टार ठरला

सगळ्यात महत्वाचं म्हणजे चाहत्यांशी असलेल्या त्याचा कनेक्ट ही त्याची जमेची बाजू होती. म्हणूनच की काय WWE मधून काही काळाचा ब्रेक घेतल्यानंतर जेव्हा सीनानं फिल्मी पडद्यावर एन्ट्री घेतली तेव्हा तो तिथेही सुपटस्टार ठरला.

द मरीन, 12 राऊंड, ट्रेनरेक, डॅडीज होम (सीरिज), बम्बल बी, फास्ट अँड फ्युरियस 9 आणि 10, द सुसाईट स्क्वड, पीसमेकर, हेड ऑफ स्टेट, जॅकपॉट, फ्रीलान्स, हिडन स्ट्राईक, इंडिपेंडेंट यासह अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमधून जॉन सीनानं कमाईचे अनेक विक्रम मोडले.

Saturday Night’s Main Event : निरोप देण्यासाठी WWE कडून मेगा प्लॅनिंग

मोठ्या पडद्या मिळणारं यश, वाढलेल्या चाहता वर्ग... अशा 48 वर्षांच्या जॉनला रेसलिंगसाठी वेळ मिळत नव्हता. म्हणूनच की काय गेल्या दोन-तीन वर्षांपासून सीना रेसलिंग रिंगमध्ये उतरलाच नव्हता. पण, इतक्या मोठ्या ग्लोबल स्टारला निरोप देण्य़ासाठी WWE च्या मॅनेजमेंटकडून मेगा प्लॅनिंग झालं. त्यासाठी सीनाला जवळपास एक वर्ष चित्रपटापासून दूर रहावं लागलं.

आज गंथरसोबतच्या सामन्यात जेव्हा सीनानं टॅपआऊट करत सामना गिव्ह अप केला, तेव्हा चाहत्यांनाच नाही तर अनेक सुपरस्टार्संनाही त्याचा धक्का बसला. पण, टॅप आऊट करत असताना सीनाच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून चाहत्यांनी सीना पुन्हा रिंगमध्ये दिसेल अशा चर्चाही सुरु केली आहे. कारण, त्याला WWE निरोप देत असतानाच रेलसर ब्रॉक लेस्नरनं I CAN SEE YOU असं पोस्टरही दाखवलंय.

त्यामुळे हॉल ऑफ फेम झालेल्या जॉन सीनाची पुन्हा रिंगमध्ये एन्ट्री होणार... की रॉकसारखा एखादा गेस्ट अॅपियरन्स दिसणार, हे पुढील काही दिवसांमध्येच कळेल. पण, तुर्तास तरी... थँक यू सीना...

ही बातमी वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL : सिराज, कृष्णा, गुरनूर ब्रार, आकिब नबी, चारपैकी कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना प्लेईंग XI मध्ये संधी? अजिंक्य रहाणेचा महत्त्वाचा सल्ला
श्रीलंकेविरोधातील पहिल्या कसोटीत कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना संधी? अजिंक्य रहाणेनं दोघांची नाव सांगितली
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget