IND vs SA T20 : भारतानं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय, जसप्रीत बुमराह संघाबाहेर, सूर्यकुमार यादवनं कारण सांगितलं
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

धर्मशाला : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात कॅप्टन सूर्यकुमार यादव यानं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय संघात दोन बदल केल्याची माहिती सूर्यकुमार यादवनं दिली. अक्षर पटेलची प्रकृती बरी नसल्यानं तो हा सामना खेळत नाही. याशिवाय जसप्रीत बुमराह वैयक्तिक कारणामुळं घरी परतल्यानं हे दोन बदल भारताच्या संघात करण्यात आल्याची माहिती सूर्यकुमार यादवनं दिली. कुलदीप यादव आणि हर्षित राणा यांना संघात स्थान दिल्याची माहिती सूर्यकुमार यादवनं दिली.
IND vs SA : तिसऱ्या टी 20 साठी भारतीय संघात दोन बदल
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या टी 20 साठी भारतीय संघात दोन बदल केल्याची माहिती कॅप्टन सूर्यकुमार यादवनं दिली. अक्षर पटेल आजारी असल्यानं तो संघाबाहेर गेला आहे. तर, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वैयक्तिक कारणामुळं घरी परतल्यानं तो देखील या सामन्यात खेळत नाही. सूर्यकुमार यादवनं हर्षित राणा आणि कुलदीप यादव या दोघांना या सामन्यात संधी दिल्याची माहिती दिली.
दक्षिण आफ्रिकेच्या संघात तीन बदल
दक्षिण आफ्रिकेच्या संघानं तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी तीन बदल केल्याची माहिती कॅप्टन एडन मारक्रम यानं दिली. डेविड मिलर, लिंडे आणि सिपम्ला या तिघांच्या जागी बॉश, नॉर्तजे आणि ट्रिस्टन स्टब्सला संधी देण्यात आली आहे.
भारताचा संघ : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, कुलदीप यादव, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, एडन मारक्रम, डेवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, डोनोवॅन फेरेइरा, मार्को यानसेन, कॉर्बिन बॉश, एनरिक नॉर्तजे, लुंगी एन्गिडी, ओटोनील बार्टमन
मालिकेत आघाडी कोण घेणार?
भारत आणि दक्षिण आफ्रिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहेत. भारतानं कटक येथे झालेला पहिला टी 20 सामना जिंकला होता. तर, दुसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताला पराभूत केलं होतं. दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताच्या गोलंदाजांची धुलाई दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी केली होती. तर, भारताचे फलंदाज देखील अपयशी ठरले होते. एकट्या तिलक वर्मानं दुसऱ्या टी 20 सामन्यात दमदार कामगिरी केली होती. आता तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये कोण विजय मिळवतंय ते पाहावं लागेल. तिसऱ्या टी 20 सामन्यात विजय मिळवणारा संघ मालिकेत 2-1 अशी आघाडी घेईल





















