एक्स्प्लोर
..म्हणून जॉन सीनाने विराट कोहलीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला!
मुंबई : डब्लूडब्लूई सुपरस्टार जॉन सीनाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे भारतीय चाहते आश्चर्यचकित झाले आहे. जॉन सीनाने टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा फोटो त्याच्या अकाऊंटवर पोस्ट केला. या फोटोमध्ये विराट अतिशय जोशमध्ये दिसत असून त्यावर टीम इंडियाचं थीम सॉन्ग 'ब्लीड ब्लू' ही लिहिलं आहे.
या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघ वेस्ट इंडीजविरोधात पहिला कसोटी सामना खेळत आहे. त्याआधीच जॉनने इन्स्टाग्रामवर विराटचा फोटो पोस्ट करुन भारतीय चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
खरंतर जॉन सीना आणि विराट कोहली यांचा एकमेकांशी थेट संबंध नाही. त्यामुळे जॉन विराटचा फॅन असल्याचं सोशल मीडिया युझर्सचं म्हणणं आहे. तर डब्लूडब्लूईच्या स्मॅकडाऊन इव्हेंटची थीम ब्लू आहे. त्यामुळे या ब्लू थीमशी संलग्न झाल्याची घोषणा करण्यासाठी जॉन सीना इंटरनेटवर ब्लीड ब्लू थीम असलेला फोटो शोधत असावा. त्यावेळी त्याला विराट कोहलीचा ब्लीड ब्लू असलेला फोटो सापडला आणि शेअर केला, असा अंदाज काहींनी वर्तवला आहे. यानंतर जॉनने विराटच्या फोटोनंतर ब्लू थीम असलला आणखी एक फोटो पोस्ट केला. ज्यावर ‘कीप काम, ब्लीड ब्लू’ असं लिहिलेलं आहे. मात्र या विराट कोहली दिसत नाही.
तरीही जॉनने विराटचा फोटो पोस्ट केल्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement