हार्दिक पांड्याला दबावाखाली विश्वचषकात स्थान मिळाले? जय शाह यांनी काय दिल्ले उत्तर
Team India : अष्टपैलू हार्दिक पांड्याला टीम इंडियात स्थान मिळाले, त्याशिवाय त्याच्याकडे उपकर्णधारपदही सोपवण्यात आले. अनेकांनी हार्दिकच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला. रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्याची निवड दबावात झाल्याचं समोर आले होते.
Jay Shah On Hardik Pandya & Team India : अष्टपैलू हार्दिक पांड्याला टीम इंडियात स्थान मिळाले, त्याशिवाय त्याच्याकडे उपकर्णधारपदही सोपवण्यात आले. त्यावरुन अनेकांची वेगवेगळी मत पाहायला मिळाली. अनेकांनी हार्दिकच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला. रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्याची निवड दबावात झाल्याचं समोर आले होते. याबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांनी स्पष्ट उत्तर दिलेय.
2023 वनडे विश्वचषकादरम्यान हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो काही काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. त्यानंतर त्यानं आयपीएलमधून कमबॅक केले, पण त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. मात्र,रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वचषकाच्या टीम इंडियात त्याला संधी मिळाली. पण त्यानंतर हार्दिक पांड्याच्या निवडीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, हार्दिक पांड्याची निवड दबावाखाली करण्यात आली आहे, पण या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे? या प्रश्नाला बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी उत्तर दिलेय.
फक्त आयपीएल कामगिरीवर निवड नाही -
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना टी-20 विश्वचषक संघातील निवडीबाबत विचारले. त्यावर ते म्हणाले की,' खेळाडूंची निवड फक्त आयपीएलच्या कामगिरीच्या आधारे केली जात नाही. याशिवाय इतरही अनेक बाबी विचारात घेतल्या होत्या. एखाद्या खेळाडूला किती आंतरराष्ट्रीय अनुभव आहे.' हार्दिक पांड्याची दबावाखाली निवड झाल्याचे सर्व दावे जय शाह यांनी यावेळी फेटाळून लावले. तसेच, जय शाह यांनी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाबाबत आपले मत व्यक्त केले.
युवा अन् अनुभवी खेळाडूंचं योग्य मिश्रण
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या निवडीबाबत जय शाह म्हणाले की, 'रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील निवडलेला संघ उत्कृष्ट आहे. अनुभवी खेळाडूंशिवाय युवा खेळाडूंचा चांगलं मिश्रण आहे. निवडकर्त्यांनी या स्पर्धेसाठी खेळाडूंच्या निवडीसाठी फक्त आयपीएलचा आधार घेतला नाही. या प्रक्रियेत अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या. या खेळाडूंनी परदेशी भूमीवर किती सामने खेळले आहेत, या खेळाडूंना किती आंतरराष्ट्रीय अनुभव आहे? दरम्यान, अलीकडेच टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय संघात हार्दिक पांड्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. त्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर जय शाह यांनी स्पष्ट शब्दात उत्तरे दिली आहेत.