एक्स्प्लोर
फिफा : जपानची विजयी सलामी, बलाढ्य कोलंबियाला नमवलं
बचावपटू कार्लोस सांचेझला लाल कार्ड मिळाल्यानं कोलंबियाला या सामन्यात ८६ मिनिटं दहा खेळाडूंनी खेळावं लागलं.

रशिया : फिफा विश्वचषकात बलाढ्य दक्षिण अमेरिकी संघाला हरवणारा जपान हा पहिला आशियाई संघ ठरला आहे. जपाननं कोलंबियावर २-१ अशी मात करून, रशियातल्या विश्वचषकात विजयी सलामी दिली. कोलंबियानं गत विश्वचषकात जपानचा ४-१ असा धुव्वा उडवला होता. जपाननं आज त्या पराभवाची परतफेड केली. शिन्जी कागावानं सहाव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर गोल डागून जपानचं खातं उघडलं. युआन क्वान्टेरोनं ३९व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर कोलंबियाला बरोबरी साधून दिली. पण युया ओसाकोनं ७३व्या मिनिटाला झळकावलेल्या गोलनं बरोबरीची कोंडी फोडली आणि जपानला एक सनसनाटी विजय मिळवून दिला. दरम्यान, बचावपटू कार्लोस सांचेझला लाल कार्ड मिळाल्यानं कोलंबियाला या सामन्यात ८६ मिनिटं दहा खेळाडूंनी खेळावं लागलं.
आणखी वाचा























